अ‍ॅपशहर

स्थायी सभेत गाजणार सफाई ठेक्यांचा मुद्दा

शहरातील सुमारे १३ प्रभागांसाठी सफाईसाठी निविदा प्राप्त झाल्या आहेत. मक्तेदारांशी किमतींबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव उद्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी सभेत येणार आहे. या विषयावरून सभेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 27 May 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon mahapalika standing comittee meeting
स्थायी सभेत गाजणार सफाई ठेक्यांचा मुद्दा

शहरातील सुमारे १३ प्रभागांसाठी सफाईसाठी निविदा प्राप्त झाल्या आहेत. मक्तेदारांशी किमतींबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव उद्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी सभेत येणार आहे. या विषयावरून सभेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

महापालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि. 27 मे) रोजी सकाळी ११ वाजता सभापती नितीन बरडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत सात विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. जळगाव शहरात नऊ प्रभागनिहाय ठेके बंद करण्यात आल्यानंतर पुन्हा सर्व वार्डांसाठी प्रभागनिहाय मक्ते देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जोपर्यंत मक्ते देण्याची ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत जुन्या मक्तेदाराकडून ३०० मजूर घेऊन काम केले जात आहे. मक्तेदारांना बोलावून घेवून त्यांच्याकडून किंमतीवर चर्चा केल्यानंतर मासिक ३ लाख १० हजार रुपयांवर सर्वांचे एकमत झाले आहे. त्यानुसार या प्रस्तावाला स्थायीची मान्यता घेण्यासाठी स्थायी सभेत चर्चेस ठेवण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज