अ‍ॅपशहर

नवरात्रीसाठी सजल्या बाजारपेठा

येत्या १ ऑक्टोबरला घटस्थापना होऊन दुर्गा उत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवामध्ये मंडळांमध्ये दांडिया-गरबा खेळण्यासाठी तरुणवर्गाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवासाठी आकर्षक रंगीबेरंगी राजस्थानी पेहेराव भाड्याने किंवा विकत घेण्याकर‌िता राजस्थानी पेहेरावांचे बाजारपेठेत स्टॉल लावण्यात आले असून, त्या ठिकाणी तरुणाई चांगलीच गर्दी करत आहे.

Maharashtra Times 28 Sep 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon market ready for navratri festival
नवरात्रीसाठी सजल्या बाजारपेठा

येत्या १ ऑक्टोबरला घटस्थापना होऊन दुर्गा उत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवामध्ये मंडळांमध्ये दांडिया-गरबा खेळण्यासाठी तरुणवर्गाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवासाठी आकर्षक रंगीबेरंगी राजस्थानी पेहेराव भाड्याने किंवा विकत घेण्याकर‌िता राजस्थानी पेहेरावांचे बाजारपेठेत स्टॉल लावण्यात आले असून, त्या ठिकाणी तरुणाई चांगलीच गर्दी करत आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी दांडिया प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात आले आहेत. याकरीता बाजारपेठेत लाल, गुलाबी, पिवळा, निळा, हिरव्या रंगातील टिपऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. टिपऱ्यांना घुंगरू किंवा मध्यभागी खड्यांची सजावट करून टिपऱ्यांमध्ये नाविन्यता कारागीरांनी आणली आहे. साधारण २० रुपयांपासून ते दीडशे रुपयांपर्यंत टिपऱ्या विक्रीसाठी बाजारपेठेत बघायला मिळत आहे. यासोबत काचेचे वर्क, कपड्यांचा स्टॉलने नागरिकांचे लक्ष वेधले आहे. यात मुलांसाठी काठेवाडी प्रकारातील डिझायनर कपड्यांना प्राधान्य मिळत आहे.

टिपऱ्या, दा‌गिन्यांना मागणी

यंदा राजस्थानी पेहेरावांमध्ये क्रॉन्ट्रास्ट घेण्यावर तरुणाईचा कल आहे. तसेच जॅकेट्स, डिझायनर धोतरचीही मागणी आहे. चमकदार काचेचे वर्क आणि गडद रंगाचे कापड अन त्यावर डिझाइन केलेल्या लेंहगा-चोली तयार करून घेण्यावर तसच रेडिमेड कपड्यांकडे युवतींचा कल असल्याचे विक्रेत्या अंकिता पाटील यांनी सांगितले. कपड्यांबरोबरच विविध प्रकारातील दागिने, मल्टिरंगांचे हार, मोठे झुमके अशा अनेक दागिन्यांनाही युवतींनी पसंती दिली आहे.

रामलीला घागऱ्यांची चलती

उत्सवाच्या काळात सर्वांपेक्षा आपण उठून दिसावं याकरीता पारंपरिक ड्रेसची क्रेझ कमी झालेली नाही. यात रामलीला या चित्रपटातील घागऱ्यांची चलती दिसून येत आहे. ते वजनाला हलके असतात पण दिसायला आकर्षक असतात, असे तरुणींचे सांगणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज