अ‍ॅपशहर

‘स्थायी’ची नावे निश्चित

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर गुरुवारी (दि. ११) झालेल्या पहिल्या महासभेत सर्व पक्षांकडून देण्यात आलेल्या यादीनुसार स्थायी समिती १६ सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली. यासह सभागृहनेतेपदी भाजपचे ललित कोल्हे तर विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे सुनील महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Maharashtra Times 12 Oct 2018, 4:00 am
सभागृहनेतेपदी ललित कोल्हे तर विरोधी पक्षनेतेपदी सुनील महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_2417


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर गुरुवारी (दि. ११) झालेल्या पहिल्या महासभेत सर्व पक्षांकडून देण्यात आलेल्या यादीनुसार स्थायी समिती १६ सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली. यासह सभागृहनेतेपदी भाजपचे ललित कोल्हे तर विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे सुनील महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महापालिकेची निवडणुकीनंतर पहिलीच महाभसा गुरुवारी सकाळी २० मिनिटे विलंबाने सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सीमा भोळे यांच्यासोबत उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, आयुक्त चंद्रकांत डांगे व नगरसचिव सुभाष मराठे उपस्थित होते.

सभागृहाची प्रतिष्ठा जपा
महासभेत बोलताना, महापौर सीमा भोळे यांनी नगरसेवकांचे स्वागत करून सभागृहाच्या मानमर्यादा पाळण्याचे आवाहन केले. अपशब्द बोलू नये, परवानगी मिळाल्यानंतरच बोलावे, असेही त्या म्हणाल्या. महापालिकेच्या सभागृहाची प्रतिष्ठा जपा तिला धक्का लागणार नाही असे कामकाज करण्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वात शक्तिशाली महापौर
या वेळी शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी भाजपच्या पहिल्या महापौर सीमा भोळे यांच्यासह भाजप, शिवसेना, एमआयएमच्या सदस्यांचे हार्दिक स्वागत केले. तसेच सीमा भोळे यांच्याकडे ५७ नगरसेवकांचे पाठबळ असल्याने त्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली महापौर असल्याचेही लढ्ढा यांनी सांगितले. महापौरांना त्यांचे पती आमदार सुरेश भोळे, राज्य सरकारची साथ असल्याने कारकीर्द प्रभावशाली राहील, असा विश्वास लढ्ढा यांनी व्यक्त केला. अपेक्षा जास्त असल्याने जबाबदारीचे ओझेदेखील जास्त असल्याचे सांगत सकारात्मक विकासात शिवसेनेचा पाठिंबा राहील, असेही लढ्ढा म्हणाले. हा सामना टेस्ट किंवा वन-डे नसून २०-२० असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

गटनेत्यांची निवड
सभेत भाजपच्या गटनेतेपदी भगत बालाणी, शिवसेनेच्या अनंत जोशी तर एमआयएमच्या गटनेतेपदी रियाज बागवान यांची निवड केल्याचे महापौरांनी जाहीर केले. सभागृहनेतेपदी ललित कोल्हे तर विरोधी पक्षनेतेपदी सुनील महाजन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सदस्यांची नावे
भाजप : भगत बालाणी, सदाशिवराव ढेकळे, अॅड. सुचिता हाडा, उज्ज्वला बेंडाळे, अॅड. दिलीप पोकळे, प्रवीण कोल्हे, सुनील खडके, प्रतिभा पाटील, चेतन सनकत, सुरेश सोनवणे, मयुर कापसे, जितेंद्र मराठे
शिवसेना : नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, नितीन बरडे,
एमआयएम : रियाज बागवान
महिला बालकल्याण समिती सदस्य : भाजपच्या रेश्मा काळे, सरिता नेरकर, शोभा बारी, सुरेखा तायडे, उषा पाटील, मंगला चौधरी, रुकसाना खान यांची शिवसेनेकडून ज्योती तायडे, जयश्री महाजन यांची नावे निश्चित करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज