अ‍ॅपशहर

महापालिकेचे ‘स्मार्ट जळगाव’अॅप

महापालिका प्रशासनातील सेवांची माहितीसह तक्रार करण्यासाठी कॉल सेंटर आणि ‘स्मार्ट जळगाव’ अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रणालीचा शुभारंभ शनिवारी (दि. २०) होणार असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.

Maharashtra Times 18 May 2017, 10:54 pm
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon municpal corporation get android mobile application smart jalgaon
महापालिकेचे ‘स्मार्ट जळगाव’अॅप


महापालिका प्रशासनातील सेवांची माहितीसह तक्रार करण्यासाठी कॉल सेंटर आणि ‘स्मार्ट जळगाव’ अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रणालीचा शुभारंभ शनिवारी (दि. २०) होणार असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.

बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, नळ संयोजन, मृत्यू दाखला काढणे यासह विविध सेवांची माहिती जाणून घेण्यासाठी आयुक्त जीवन सोनवणे यांनी कॉल सेंटर कार्यान्वित केले आहे. यासह ‘स्मार्ट जळगाव’ अॅपदेखील कार्यान्वित करण्यात आले आहे. कॉल सेंटर आणि स्मार्ट जळगाव अॅप यावर जवळपास ९० प्रकारच्या तक्रारी नोंदविणे शक्य होणार आहे. कॉलसेंटरसाठी ६९०००५१००० हा युनिक क्रमांक देण्यात आलेला आहे. सकाळी ७ वाजेपासून ते ११ वाजेपर्यंत कॉल सेंटरला तक्रारी नोंदवून घेतल्या जातील किंवा माहिती जाणून घेता येईल. ‘स्मार्ट जळगाव’ हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.

दंडात्मक कारवाई

विभागनिहाय तक्रारींचा तक्ता तयार केला जाईल. सर्वाधिक तक्रारींचे निराकरण करणार्‍या पहिल्या तीन विभागांना दरमहा पारितोषिक तर सर्वात कमी तक्रारींचे निराकरण करणाऱ्या शेवटच्या तीन विभागांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


स्वच्छतेच्या तक्रारी ‘व्हॉट्सअॅप’वर

शहरात ठिकठिकाणी साफसफाई होत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होतात. परंतु, आता ज्या भागात साफसफाई होत नसेल त्या भागातील नागरिकांनी फोटोसह ठिकाण लिहून आरोग्य विभाग डॉ. विकास पाटील यांच्या व्हॉट्सअॅपवर (९४०३६८६२१०) पाठवाव्या. दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या तक्रारींचे दिवसभरात निराकरण केले जाईल. दुपारी १२ नंतर आलेल्या तक्रारींचे दुसऱ्यादिवशी निराकरण करण्यात येणार असल्याचे आयुक्त सोनवणे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज