अ‍ॅपशहर

८ वर्षाय मुलीला वॉशिंग पावडर आणायला सांगून केले धक्कादायक कृत्य, आयुष्यभर लक्षात राहील असे मिळाले फळ

A man sentenced to 5 years imprisonment : जळगाव शहरातील एका भागात आठ वर्षीय मुलगी आपल्या कुठुंबियांसह वास्तव्याला आहे. ११ ऑक्टोबर २०१६ रोजी पीडित मुलीच्या घराच्या बाजूला राहणारा लाला मुकर्रर पटेल (वय-५३) याने मुलीला दुकानातून वॉशिंग पावडर घेवून आणण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात लाला मुकर्रर पटेल याला अटक करण्यात आली होती.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Aug 2022, 9:03 pm
जळगाव : जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ४५ हजार रूपयांचा दंडांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारी विशेष न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. (a 53 year old man was sentenced to 5 years rigorous imprisonment for raping a minor girl)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a 53 year old man was sentenced to 5 years rigorous imprisonment for raping a minor girl
८ वर्षाय मुलीला वॉशिंग पावडर आणायला सांगून केले धक्कादायक कृत्य


याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात आठ वर्षीय मुलगी आपल्या कुठुंबियांसह वास्तव्याला आहे. ११ ऑक्टोबर २०१६ रोजी पीडित मुलीच्या घराच्या बाजूला राहणारा लाला मुकर्रर पटेल (वय-५३) याने मुलीला दुकानातून वॉशिंग पावडर घेवून आणण्यास सांगितले. त्यानंतर त्याने या ८ वर्षीय अल्ववयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात लाला मुकर्रर पटेल याला अटक करण्यात आली होती.

क्लिक करा आणि वाचा- शेतात आढळला तरुणाचा मृतदेह, दोन अल्पवयीन मुलं ताब्यात; आरोपींनी दिली धक्कादायक कबुली

पीडित मुलीसह पाच साक्षिदारांची साक्ष ठरली महत्वपूर्ण

या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयात विशेष न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात पीडित मुलीची आई, पिडीत मुलगी, तपासाधिकारी आणि पंच याची साक्ष महत्वाची ठरली.

क्लिक करा आणि वाचा- पाण्याच्या टाकीत कबुतरं मेली, पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघात दूषित पाण्याचा पुरवठा

त्यानुसार न्यायालयाने बुधवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी लाला पटेल याला दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास आणि ४५ हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्याच पुन्हा ४ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड.चारूलता बोरसे यांनी काम पाहिले.

क्लिक करा आणि वाचा- जळगावात खळबळ! सोन्या-चांदीचा व्यापारी दुकान बंद करुन घराकडे निघाला, मात्र घरी पोहचलाच नाही

महत्वाचे लेख