अ‍ॅपशहर

चेन स्नॅचर्सकडून मुद्देमाल जप्त

दुचाकीवरून महिलांच्या सोनसाखळ्या लांबविणारे चोरटे स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केले. त्यांच्याकडून विविध गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालापैकी सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Maharashtra Times 7 Jan 2018, 4:00 am
जळगाव पोलिसांकडून धडक कारवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon police arrest chain snatchers at jalgaon
चेन स्नॅचर्सकडून मुद्देमाल जप्त


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

दुचाकीवरून महिलांच्या सोनसाखळ्या लांबविणारे चोरटे स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केले. त्यांच्याकडून विविध गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालापैकी सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईत २ लाख २३ हजार ४१० रुपये किमतीचे १२७ ग्रॅम सोने, ३४ हजार रुपये किमतीचे ४ मोबाइल फोन व गुन्ह्याकरता वापरलेली ५० हजार रुपये किमतीची दुचाकी असा ३ लाख ७ हजार ४१० रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जामनेर व भुसावळसह जळगाव शहरातून मोटार सायकलवरून महिलांच्या सोनसाखळी लांबविण्याबाबत गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी सुनील कुराडे यांना गुन्ह्यांच्या तपासाबाबत सूचना देऊन पथके रवाना करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील वापी येथील करण प्रल्हाद मोहिते, दीपक रेवाराम बेलदार, दिनेश गजेंद्र मोहिते यांना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. संशयितांना जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात चोरीस गेलेला १ मोबाइल फोन व दुचाकी वाहन हस्तगत करण्यात आली. त्यांची ओळख परेड होऊन न्यायालयात हजर केले असता ८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज