अ‍ॅपशहर

‘रेमंड’ युनियनकडून ७८ लाखांचा अपहार!

रेमंड कंपनीतील कामगारांच्या ‘फोर्फिट अलाउंस’ची ७८ लाखांची रक्कम युनियनच्या खात्यात वर्ग न करता, कामगार उत्कर्ष सभा पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात वर्ग करून अपहार गेल्याचा आरोप ललित कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Maharashtra Times 21 Jan 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon remand company fraud
‘रेमंड’ युनियनकडून ७८ लाखांचा अपहार!


रेमंड कंपनीतील कामगारांच्या ‘फोर्फिट अलाउंस’ची ७८ लाखांची रक्कम युनियनच्या खात्यात वर्ग न करता, कामगार उत्कर्ष सभा पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात वर्ग करून अपहार गेल्याचा आरोप ललित कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला. संबंधित पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोल‌िस अधीक्षकांकडे कामगारांनी तक्रार दिली असल्याचेही कोल्हे यांनी सांगितले.

रमंड कंपनीतील कामगारांच्या ‘फोर्फिट अलाउंस’ची रक्कम युनियनच्या खात्यात जमा केली जाते. ही रक्कम कामगारांच्या हितासाठी वापरली जाते. परंतु कामगार उत्कर्ष सभेच्या पदाधिकाऱ्यांनी तब्बल ७८ लाखाची रक्कम युनियनच्या खात्यात जमा न करता, वैयक्तिक खात्यात जमा केल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातून माहिती अधिकारांतर्गत उघड झाली असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

कामगारांच्या रकमेचा अपहार केल्यामुळे कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष दिलीप महाजन, उपाध्यक्ष दिवाकर चौधरी, सचिव तुषार राणे, सुनील फालक, अनिल पाटील, नवल पी. पाटील, दिलपी वराडे, किरण भारंबे यांच्या विरुद्ध कारवाई करावी, यामागणीसाठी दिलीप रडे, पद्माकर खडके, शिरीष पाटील, जगन्नाथ पाटील, रमेश कोल्हे, मधुकर भंगाळे, प्रदीप वायकोळे यांनी पोल‌िस अधीक्षकांकडे तक्रार दिली असल्याचेही कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कामगारांच्या हिताची रक्कम व्याजासह परत मिळावी, अशी मागणी देखील कोल्हे यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज