अ‍ॅपशहर

कर्मचाऱ्याने घेतला निलंबनाचा धसका

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे संप हाल गुरुवारी (दि.१९) तिसऱ्या दिवशीही कायम होते. जिल्ह्यातील संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकास गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra Times 20 Oct 2017, 4:48 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon st workers heart hattak
कर्मचाऱ्याने घेतला निलंबनाचा धसका


एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे संप हाल गुरुवारी (दि.१९) तिसऱ्या दिवशीही कायम होते. जिल्ह्यातील संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकास गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राज्यात एसटी कामगारांचा बेमुदत संप सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात या संपास १०० टक्के प्रतिसाद आहे. गुरुवारी सकाळी साडेअकरा ते पावणेबारा वाजता संपात सहभागी चालक देवीदास सपकाळे यांनी स्थानकात दूरचित्रवाणी संचावर संपातील कामगारांना निलंबीत करणार तसेच गुन्हे दाखल करणार असल्याच्या वृत्ताचा धसका घेतला. त्यामुळेच त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे सहकाऱ्यांनी सांग‌तिले. सपकाळे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांग‌तिले.


धुळ्यात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

धुळे ः येथील आगारात गुरुवारी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याविरोधात घोषणाबाजी करुन अर्धनग्न आंदोलन केले. संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचारी संघटनांच्या १६ संघटनांनी बसस्थानकात निदर्शने केली. कर्मचाऱ्यांनी शर्ट काढून अर्धनग्न होत शासन व परिवहन मंत्री रावते यांचा निषेध केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज