जळगाव: भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर असलेल्या एका कंपनीत वेल्डिंग करताना झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Bhusawal Chemical Factory Blast) वाचा: आम्ही जे करतो ते खुलेआम; शिवसेना आमदाराचा खडसेंना सणसणीत टोला
मिळालेल्या माहितीनुसार, दिया कॉपर मास्टर अलायन्स कंपनी ही भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंपनीतील ऑइल टाकीला दोन कर्मचारी वेल्डिंग करण्याचे काम करत होते. वेल्डिंग करताना अचानक शार्टसर्किटमुळे मोठा स्फोट झाला. यानंतर लागलेल्या आगीत होरपळून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. काशिनाथ सुरवाडे (रा. खेडी रोड, जळगाव) आणि खेमसिंग पटेल (रा. बेमतेरा, छत्तीसगड) अशी या दोघांची नावं आहेत. हा स्फोट इतका मोठा होता की त्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरात घबराट उडाली होती. परिसरातील नागरिकांनी आवाजाच्या दिशेनं धाव घेत घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेतली आहे. मयत झालेले कर्मचाऱ्यांची अधिक माहिती घेतली जात आहे. आग विझविण्यासह इतर कार्यवाही सुरू आहे.
वाचा: अमोल कोल्हे नथुरामच्या भूमिकेत; बाळासाहेब थोरात म्हणाले...