अ‍ॅपशहर

धुळ्यातील तरुणाला पाच हजारांचा गंडा

धुळे येथील रहिवासी असलेल्या तरुणाच्या खात्यातून तीनवेळा ट्रान्झॅक्शन करून पाच हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी (दि. २४) उघडकीस आला.

Maharashtra Times 25 Jul 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgoan city crime news
धुळ्यातील तरुणाला पाच हजारांचा गंडा


धुळे येथील रहिवासी असलेल्या तरुणाच्या खात्यातून तीनवेळा ट्रान्झॅक्शन करून पाच हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी (दि. २४) उघडकीस आला.

याप्रकरणी तरुणाने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. कैलास मच्छिंद्र पाटील हा तरुण धुळ्याचा रहिवासी असून, पुणे येथील चिंचवडमध्ये दि कल्याण जनता सहकारी बँकेत त्याचे खाते आहे. त्याच्या खात्यातून दि. ११ जुन रोजी सकाळी ९.४५ ते १०.४५ या एक तासात तीनवेळा ट्रान्झॅक्शन करून चोरट्याने गणेश कॉलनी परिसरातील महावीर सहकारी बँक शाखेच्या एटीएममधून ५ हजार रुपयांची रोकड काढली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कैलासला कळताच त्याने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार देत सीसीटीव्ही फुटेज तपासण्याबाबतही अर्ज दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज