अ‍ॅपशहर

अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

खान्देशातील आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्या बाजार या उत्सवाला गावी आलेल्या तसेच गुन्ह्यांमध्ये संशयित असलेल्या आणखी दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. १६) अटक केली.

Maharashtra Times 17 Mar 2019, 5:00 am
भोंगऱ्या बाजारात पोलिसांकडून दोघांना अटक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgoan police arrested two criminals
अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

खान्देशातील आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्या बाजार या उत्सवाला गावी आलेल्या तसेच गुन्ह्यांमध्ये संशयित असलेल्या आणखी दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. १६) अटक केली.

डब्बु उर्फ डब्या उंदल्या उर्फ आदिल बारेला (रा. चिलारीया, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) व गुलाब दलसिंग बारेला (रा. गेरुघाटी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. डब्बू हा दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी असून, तो गेल्या पंधरा वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरुद्ध यावल, चोपडा या परिसरात दरोडा टाकल्याचे गुन्हे दाखल आहेत. गुलाब बारेला हा प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी आहे. २००७ मध्ये त्याने चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला केला होता. तोही १२ वर्षांपासून फरार होता.

फरार आरोपी अटकेत
शहरातील शहर पोलिस ठाण्यात १८ फेब्रुवारी २०१९ रोजी दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. मालेगाव येथून पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. अझरोद्दीन उर्फ अज्जू गयासोद्दीन शेख (रा. गेंदालाल मील) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

गुटखा तस्करी करणाऱ्यांना अटक
चारचाकीतून १ लाख ८४ हजार रुपयांचा गुटखा तस्करी करणाऱ्या दोघांवर २६ डिसेंबर २०१८ रोजी एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली होती. दोन्ही संशयित हजर राहत नसल्यामुळे शनिवारी पोलिसांनी त्यांना भुसावळ येथून अटक केली. विक्की आशोक कुमार सादेजा (वय २५) व संजय सुनंदरदास दुसेजा (वय ३३, दोघे रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

मधमाशांच्या हल्ल्यात वृध्द जखमी
शेतात काम करणाऱ्या दोन वृद्धांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दगुबाई शांताराम वाघ (वय ७२) व मधुकर सोनू शेळके (वय ८५, दोघे रा. चिंचोली, ता. जळगाव) असे जखमी वृद्धांची नावे आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज