अ‍ॅपशहर

ताळेबंदानुसार २२२ गावे जलयुक्त

जलयुक्त शिवार अभियानातंर्गत गावांची निवड करताना तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या ताळेबंदानुसार दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व २२२ गावे जलयुक्त झाली आहे.

Maharashtra Times 26 Apr 2018, 4:00 am
गाळमुक्त धरणांसाठी २ कोटी १६ लाखांचा निधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalyukt shivar works done in jalgaon districts 222 villages with proper manner
ताळेबंदानुसार २२२ गावे जलयुक्त


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जलयुक्त शिवार अभियानातंर्गत गावांची निवड करताना तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या ताळेबंदानुसार दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व २२२ गावे जलयुक्त झाली आहे.

यामध्ये जामनेर तालुक्यातील सर्वाधिक २६ गावे, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा तालुक्यातील प्रत्येकी २० गावांचा समावेश आहे. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्याला २ कोटी १६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत कृषी विभागाच्यावतीने ही माहिती देण्यात आली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर, उप वनसंरक्षक दिगंबर पगार, उप वनसंरक्षक संजय दहिवले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, कार्यकारी अभियंता नाईक आदी उपस्थित होते.

राज्यात शाश्वत सिंचन वाढावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्याला २ कोटी १६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर व पारोळा या तालुक्यांना प्रत्येकी २० लाख रुपये, जळगाव, धरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ व एरंडोल या तालुक्यांना प्रत्येकी १० लाख रुपये तर चोपडा, रावेर, यावल या तालुक्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

शनिवारी पाहणी दौरा
जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले हे शनिवारी (दि. २८) सकाळी या योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आहे. त्यानंतर ते जामनेर तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांची पाहणी करणार असल्याचेही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज