अ‍ॅपशहर

जिल्ह्यात जलयुक्तची कामे चांगली

जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात जलसंधारण उपायांनुसार कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात येत असून, जळगाव जिल्हा हा १०० टक्के कामे पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जलसंधारणांमुळे राज्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे, असे मत राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 14 May 2017, 4:00 am
जलसंधारण मंत्री राम शिंदेंचे मत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalyukt shivar works good at jalgaon district
जिल्ह्यात जलयुक्तची कामे चांगली


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात जलसंधारण उपायांनुसार कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात येत असून, जळगाव जिल्हा हा १०० टक्के कामे पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जलसंधारणांमुळे राज्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे, असे मत राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीनंतर ते शनिवारी (दि.१३) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना जलसंधारण मंत्री शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान जळगाव जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सुरू आहे. या अभियानांतर्गत समाविष्ट टँकरफेड गावांमधील पाणीटंचाईचा प्रश्न सुटला असून, जिल्ह्याची टँकरमुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे.

जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानामुळे सर्व यंत्रणा एकत्रित काम करीत असल्याने लोकजागृतीचे काम व लोकांचा सहभाग अधिक परिणामकारक झालेला आहे. जलसंधारण ही लोकचळवळ झाली असून, शेतीसाठी व पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याची मानसिकता जनमानसात तयार झालेली आहे. राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने धरणांमधील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना’ सरकारने नुकतीच सुरू केली असून, याअंतर्गत जिल्ह्यातील लघुपाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गावतलाव, पाझरतलावातील गाळ स्थानिक शेतकऱ्यांना मोफत मिळणार असून त्यांना तो स्व-खर्चाने वाहून न्यावा लागणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली. या वेळी महानगरपालिका, महावितरण, भारत संचार निगम लि., रेल्वे अशा विभागांचाही आढावा घेण्यात आला असून, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना अशा योजनांबाबतही आढावा घेतला गेला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज