अ‍ॅपशहर

‘जेडीसीसी’चा दर्जा खालावणार!

जिल्हा बँक सध्या ‘अ’ वर्गात आहे. पण, नोटाबंदीच्या निर्णयामुळे यंदा जळगाव जिल्हा बँक ‘ब’ वर्गात येण्याची शक्यता असल्याची माहिती बँकेचे ज्येष्ठ संचालक व आमदार एकनाथ खडसे यांनी आज दिली.

Maharashtra Times 23 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jdcc bank position will down
‘जेडीसीसी’चा दर्जा खालावणार!


जिल्हा बँक सध्या ‘अ’ वर्गात आहे. पण, नोटाबंदीच्या निर्णयामुळे यंदा जळगाव जिल्हा बँक ‘ब’ वर्गात येण्याची शक्यता असल्याची माहिती बँकेचे ज्येष्ठ संचालक व आमदार एकनाथ खडसे यांनी आज दिली. बँकेच्या १०१ व्या वार्षिक सभेत बोलत असतांना त्यांनी ही भीती व्यक्त केली. काम करीत असतांना कोणी क‌ितीही टीका केली तरी मी बँकेचे नुकसान होवू देणार नाही, असेही त्यांनी सांग‌ितले.

जळगाव जिल्हा सहकारी बँकेची वार्षिक सभा शुक्रवारी झाली. यावेळी ज्येष्ठ संचालक एकनाथ खडसे, चेअरमन रोहिणी खडसे, व्हाईस चेअरमन किशोर पाटील, खा. ए. टी. पाटील, आ. संजय सावकारे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. सुरेश भोळे, चिमणराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, नानासाहेब देशमुख, अॅड. रवींद्र पाटील, संजय पवार, अनिल पाटील, वाडीलाल राठोड, तिलोत्तमा पाटील, नंदकिशोर महाजन यांच्यासह बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.

खडसे म्हणाले, अनेकांनी आपल्या ठेवी काढल्याने बँकेतून २५० कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या. परंतु शेतकरी व सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळे बँक या संकटातून पार झाली. पहिल्यांदाच बँकेला अ दर्जा मिळाला आहे. पण नोटबंदीच्या फटक्यामुळे १ हजार व ५०० रुपयांच्या नोटा पडून होत्या. यांचा व्याजाचा र्भुदंड भरावा लागला.

कर्जमाफीबद्दल नाराजी

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरले त्यांना केवळ २५ हजार रुपये तर ज्यांनी कर्ज भरले नाही त्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यामुळे अनेक शेतकरी सभासदांनी सभेत नाराजी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज