अ‍ॅपशहर

'किल्ले बनवा'चे आज बक्षीस वितरण

येथील आशा फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन आयोजित किल्ला बनवा स्पर्धेचे आज (दि. १८) रोजी सायंकाळी ४.३० वाजता भाऊंच्या उद्यानात बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.

Maharashtra Times 18 Oct 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kille banva competition prize distribution on today jalgaon
'किल्ले बनवा'चे आज बक्षीस वितरण


येथील आशा फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन आयोजित किल्ला बनवा स्पर्धेचे आज (दि. १८) रोजी सायंकाळी ४.३० वाजता भाऊंच्या उद्यानात बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, दीप्ती कराळे, अजय ललवाणी व ममता ललवाणी, राजेश चोरडिया व शिल्पा चोरडिया, प्रशांत महाशब्दे व वर्षा महाशब्दे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी अनुभूती शाळेच्या संचालिका निशा जैन राहतील. परीक्षकांनी प्राथमिक, माध्यमिक शालेय गट तसेच खुल्या गटातून निवडलेल्या संघांना तसेच जळगावकर नागरिकांनी निवडलेल्या पहिल्या पाच संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तरी स्पर्धक, पालक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गिरीश कुळकर्णी व विराज कावडीया यांनी केले आहे. दि. १५ व १६ ऑक्टोबर रोजी काव्य रत्नावली चौकात दरवर्षीप्रमाणे दीपावलीच्या पावन पर्वावर किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ३८ संघानी सहभाग नोंदविला होता. स्पर्धकांनी रायगड, तोरणा, सिंधुदुर्ग, सरसगड, देवगिरी, शिवनेरी, प्रतापगड, विजयदुर्ग, जंजिरा या शिवकालीन किल्ल्यांसह काही काल्पनिक किल्लेही साकारले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज