अ‍ॅपशहर

धरणगावसाठी गिरणेचे आवर्तन सोडा

धरणगाव तालुक्यासाठी गिरणा धरणाच्या पाण्याचे तीन आवर्तन राखीव ठेवत ते येणाऱ्या रब्बी हंगामासाठी व पिण्याचा पाण्यासाठी सोडावे, अशा मागणीचे निवेदन माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २) उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेपाटील यांच्याकडे दिले.

Maharashtra Times 3 Nov 2017, 4:00 am
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम leaving water from girna dam for dharangaon taluka
धरणगावसाठी गिरणेचे आवर्तन सोडा


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

धरणगाव तालुक्यासाठी गिरणा धरणाच्या पाण्याचे तीन आवर्तन राखीव ठेवत ते येणाऱ्या रब्बी हंगामासाठी व पिण्याचा पाण्यासाठी सोडावे, अशा मागणीचे निवेदन माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २) उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेपाटील यांच्याकडे दिले.

जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत धरणगाव तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाळा झाला आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम तर दुबार पेरणी करूनही शेतकऱ्यांचा हातातून गेला आहे. तसेच आतापासूनच अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा भेडसावत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. यावर्षी गिरणा धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरणाचा जलसाठा ७१ टक्क्यांवर पोहचला आहे. या जलसाठ्यातून धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या येणाऱ्या रब्बी हंगामासाठी व पिण्याचा पाण्यासाठी तीन आवर्तन राखीव ठेवत ते पाणी तालुक्यातील शेतकरी व जनतेसाठी सोडून पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत गिरणा धरणाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने यांनाही दिली आहे.

या निवेदन देतेवेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक वाल्मिक पाटील, माजी जि. प. सदस्य रवींद्र पाटील, माजी उपसभापती विजय नारखेडे, तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, जिजाबराव पाटील, गजानन पाटील, सरपंच अनिल पाटील, रवींद्र पाटील, रामभाऊ पाटील, भगवान पाटील, गणेश पाटील, प्रल्हाद पाटील, नवल पाटील, भगवान मराठे सुपडू पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, मनोज पाटील, तुळशीराम पाटील, शशिकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज