अ‍ॅपशहर

अन्यथा जानेवारीपासून पेन्शन बंद

पेन्शनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) दिला असला, तरी यापुढे संगणकीकृत हयातीचा दाखल देणे अनिवार्य आहे. पेन्शनधारकांना जवळच्या सेतू कार्यालयात या दाखल्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. अन्यथा जानेवारी २०१७ पासून पेन्शन बंद करण्यात येणार असल्याचे नाशिक येथील भविष्य निधी आयुक्त अरुणकुमार यांनी सांगितले आहे.

Maharashtra Times 6 Dec 2016, 11:03 pm
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम life certificate
अन्यथा जानेवारीपासून पेन्शन बंद

पेन्शनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) दिला असला, तरी यापुढे संगणकीकृत हयातीचा दाखल देणे अनिवार्य आहे. पेन्शनधारकांना जवळच्या सेतू कार्यालयात या दाखल्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. अन्यथा जानेवारी २०१७ पासून पेन्शन बंद करण्यात येणार असल्याचे नाशिक येथील भविष्य निधी आयुक्त अरुणकुमार यांनी सांगितले आहे.

भविष्य निधी कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत १ लाख २५ हजार पेन्शनधारक पेन्शन प्राप्त करतात. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक पेन्शनधारकास जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते, तसेच जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास जोपर्यंत प्रमाणपत्र सादर करत नाही तोपर्यंत पेन्शन बंद करण्यात येते. पेन्शनधारकांच्या हिताचा विचार करून शासनाने जीवन प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपातच देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी पेन्शनधारक ते ज्या बँकेमार्फत पेन्शन प्राप्त करतात त्या ठिकाणी नजिकच्या सेतू कार्यालय, ई-महासेवा केंद्र, भविष्य निधी कार्यालय, नाशिक येथे किंवा भविष्य निधी जिल्हा कार्यालय या ठिकाणी डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी नोंदणी करू शकतात. त्यासाठी पेन्शनधारकाने सोबत पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँक पासबुक, आधार कार्ड आणि मोबाइल हॅण्डसेट ठेवणे आवश्यक आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्र नोंदणी न केल्यास जानेवारी २०१७ पासून पेन्शन बंद करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज