अ‍ॅपशहर

साहित्य अभिवाचन महोत्सव रविवारपासून रंगणार

‘परिवर्तन जळगाव’तर्फे साहित्य अभिवाचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वाचन संस्कृती समृद्ध करू या’ हे ब्रीद घेऊन सुरू करण्यात आलेला साहित्य अभिवाचन महोत्सव आठ दिवस चालणार आहे. दि. २ ते ९ सप्टेंबर २०१८ या दरम्यान सायंकाळी ७ वाजता मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचे यंदाच हे चौथे वर्ष आहे.

Maharashtra Times 30 Aug 2018, 5:00 am
वाचन संस्कृती रुजविण्यासाठी उपक्रम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम literature abhiwachan festival start from sunday at jalgaon by parivartan sanstha
साहित्य अभिवाचन महोत्सव रविवारपासून रंगणार


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

‘परिवर्तन जळगाव’तर्फे साहित्य अभिवाचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वाचन संस्कृती समृद्ध करू या’ हे ब्रीद घेऊन सुरू करण्यात आलेला साहित्य अभिवाचन महोत्सव आठ दिवस चालणार आहे. दि. २ ते ९ सप्टेंबर २०१८ या दरम्यान सायंकाळी ७ वाजता मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचे यंदाच हे चौथे वर्ष आहे.

महोत्सवाससन २०१५ मध्ये सुरुवात झाली. उत्तमोत्तम पुस्तकांचा परिचय व्हावा, वाचकांना वाचनासाठी प्रवृत्त करावे, चांगल्या पुस्तकांची आवड युवा वर्गात निर्माण व्हावी, अशा विविध अंगाने हा साहित्य अभिवाचन महोत्सव आकाराला आला आहे. मोबाइल व व्हॉट्सअॅपच्या या काळात पुस्तकांशी नाते जोडायला लावणाऱ्या आठ दिवसांच्या अभिवाचन महोत्सवात शब्दांना संगीत, प्रकाश, नेपथ्य व दिग्दर्शकीय कौशल्यातून मंचित होणारे अभिवाचन अनुभवायला मिळणार आहे. नाटक व साहित्य यांचा अनोखा मिलाफ या महोत्सवामध्ये होतो. साहित्यकृतींचा नाट्यानुभव हे परिवर्तन अभिवाचन महोत्सवाच वैशिष्ट्य आहे. अभिवाचनाचा सलग आठ दिवस चालणारा राज्यामधील हा एकमेव महोत्सव असल्याची माहिती परिवर्तनने दिली आहे.

पाच ते ७० वर्षांपर्यंतच्या कलावंतांचा सहभाग
वाचन संस्कृती लोप पावत आहे, मराठी भाषा संकटात आहे, अशी भीती सगळे व्यक्त करीत असतात. या पार्श्वभूमीवर, उत्तमोत्तम साहित्याचा परिचय रसिकांना व्हावा, श्रेष्ठ साहित्यिकांची ओळख व्हावी, वाचन संस्कृती समृद्ध व्हावी, वाचनाची गोडी लागावी यासाठी परिवर्तनने आपल्या नाट्याच्या माध्यमातून, अभिवाचनाच्या माध्यमातून हा वाचन संस्कृतीचा महोत्सव सुरू केला आहे. ५ ते ७० वर्ष या वयोगटामधील कलावंत या महोत्सवामध्ये सहभागी होतात, हे महोत्सवाचे वेगळेपण आहे.

नव्या कलावंतांना संधी
कथा, कादंबरी, कविता, लेख, आत्मचरित्र, नाटक असे विविध साहित्य प्रकारांचे नाट्यवाचन परिवर्तन कलावंतानी केलेले आहे. अनुभवी रंगकर्मी सोबतच नव्या कलावंतांनादेखील या अभिवाचन महोत्सवामधून रंगमंचावर येण्याची संधी परिवर्तनने उपलब्ध करून दिली आहे. या महोत्सवाला परिवर्तनचे मार्गदर्शक ना. धो. महानोर, अशोक जैन, विजय बाविस्कर, श्रीकांत देशमुख, अनिल पाटकर, मोहन थत्ते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. साहित्य अभिवाचन महोत्सवाचा समारोप दि ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. रोटरी क्लब वेस्ट यांचेही सहकार्य लाभत असून, उपस्थितीचे आवाहन महोत्सव प्रमुख विनोद पाटील व मनोज पाटील यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज