अ‍ॅपशहर

बालगंधर्व खुले नाट्यगृहाचे ‘मेकओव्हर’

महानगरपालिकेने गठीत केलेल्या वास्तूविशारदांद्वारे शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहाचे बंदिस्त किंवा अन्यप्रकारे नूतनीकरण करण्याच्या सूचना महापौर सीमा भोळे यांनी आयुक्तांना पत्र देऊन केल्या आहेत. त्यामुळे आता गेल्या कित्येक दिवसांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या नाट्यगृहाचे अखेर ‘मेकओव्हर’ होणार असल्याने जळगावरांनी समाधान व्यक्त केले आहे.

Maharashtra Times 8 Nov 2019, 4:00 am
महापौर भोळेंनी दिल्या नूतनीकरणाच्या सूचना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम makeover of jalgaon city balgandharva open theater
बालगंधर्व खुले नाट्यगृहाचे ‘मेकओव्हर’

म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महानगरपालिकेने गठीत केलेल्या वास्तूविशारदांद्वारे शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहाचे बंदिस्त किंवा अन्यप्रकारे नूतनीकरण करण्याच्या सूचना महापौर सीमा भोळे यांनी आयुक्तांना पत्र देऊन केल्या आहेत. त्यामुळे आता गेल्या कित्येक दिवसांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या नाट्यगृहाचे अखेर ‘मेकओव्हर’ होणार असल्याने जळगावरांनी समाधान व्यक्त केले आहे.
गतकाळापासून जळगाव नगरपालिका अस्तित्वात असताना शहराच्या मध्यस्थित असलेले बालगंधर्व खुले नाट्यगृह हे अनेक गोष्टींचा वारसा आहे. शहरातील नाट्यकलावंत व नाट्यप्रेमी यांसाठी आजही बालगंधर्व खुले नाट्यगृहाचे विशेष महत्त्व आहे. सद्य:स्थितीत नाट्यगृहाची स्थिती जीर्ण झालेली असून, यास्तव शहरातील नाट्यप्रेमी, कलावंत व नागरिकांनी याबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केलेली आहे. परिणामी, या खुल्या नाट्यगृहाचे नूतनीकरण, सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. त्यामुळे आता महापौर सीमा भोळे यांनी मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांना पत्राद्वारे याबाबतच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये महापालिकेने गठीत केलेल्या वास्तूविशारदांद्वारे बालगंधर्व खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण बंदिस्त किंवा कसे सुशोभित करता येईल. याबाबत संबंधितांसोबत चर्चा करून बालगंधर्व खुले नाट्यगृह सुशोभीकरण करण्याची कार्यवाही करावी, अशीही सूचना महापौर भोळे यांनी आयुक्त डॉ. टेकाळे यांना केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज