अ‍ॅपशहर

आंबा, घागर, डांगरने गजबजला बाजार

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला घागर, आंबा, पितरांच्या पुजेसाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदीसाठी नागरिकांची शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Maharashtra Times 28 Apr 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mango market in groth jalgaon
आंबा, घागर, डांगरने गजबजला बाजार


साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला घागर, आंबा, पितरांच्या पुजेसाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदीसाठी नागरिकांची शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सोन्याची दुकाने ग्राहकांच्या गर्दीने फुलली होती. शिवाय वाहनांचे बुकिंगही तेजीत होते. या व्यतिरिक्त डांगर, कलिंगड, आंब्यांनाही मागणी होती.

अक्षयतृतीया हा खानदेशवासीयांचा जिव्हाळ्याचा सण आहे. तो जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी शहरात आज घागर, खरबूज, आंबे खरेदीला वेग आला असून, बाजारात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघावयास मिळाली. आंब्याचा सिझन सुरू झाला असला तरी खान्देशमध्ये अक्षय्य तृतियेला आंबाच्या नैवेद्य दिल्यानतंरच आंबे खाण्यास सुरुवात होते. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झाली आहे. ५० रुपये किलोपासून आंब्यांचे भाव आहेत.

यंदा घागरींचे दर गतवर्षीपेक्षा अधिक असल्याने नागरिकांनी लहान घागरींना पसंती दर्शविली आहे. यात लहान घागरी ३० ते ४० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत. तर मोठ्या घागरी ६० ते ७० रुपयांना मिळत आहेत. आखाजी'चा सण म्हटला, की त्यात आंब्याप्रमाणेच डांगराचेदेखील महत्त्व असते. यंदा खान्देशात डांगराचे उत्पादन अधिक झाले असल्याने त्यांचे दर स्थिर आहेत. २० ते २५ रुपये किलोप्रमाणे ते विक्रीस उपलब्ध आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज