अ‍ॅपशहर

मेडिसीन डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत वाद

जिल्हा मेडिसीन डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत संघटनेबाबत कुरघोड्या करणार्‍या सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्यात यावे, या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. अध्यक्ष सुनील भंगाळे बैठकीत बोलू देत नसल्याचा आरोपही करण्यात आला. केमिस्ट बांधवाच्या प्रलंबित मागण्यासाठी भाजप केमिस्ट महासंघाच्यावतीने बैठकीच्या ठिकाणी आंदोलनही करण्यात आले.

Maharashtra Times 24 May 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम medicine dealers association meeting at jalgaon
मेडिसीन डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत वाद

जिल्हा मेडिसीन डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत संघटनेबाबत कुरघोड्या करणार्‍या सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्यात यावे, या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. अध्यक्ष सुनील भंगाळे बैठकीत बोलू देत नसल्याचा आरोपही करण्यात आला. केमिस्ट बांधवाच्या प्रलंबित मागण्यासाठी भाजप केमिस्ट महासंघाच्यावतीने बैठकीच्या ठिकाणी आंदोलनही करण्यात आले.

जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा सुनील भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. २३) पार पडली. यावेळी अनिल झंवर, महेंद्र महाजन, धनंजय तळेले, शामकांत वाणी, प्रदीप देशमुख, श्रीकांत पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीत ११ विषयांना मंजुरी देण्यात आली. या वेळी संजय नारखेडे, दीपक जोशी यांनी काही विषयांवर हरकत घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत बोलू दिले जात नसल्याचा आरोप अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्यावर केला. सत्ताधारी गटाचे सदस्यांनी संघटनेविषयी कुरघोडी करणार्‍या सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्याची मागणी करून प्रोसेडिंगला नोंद घ्यावी, असे सांगितले. संघटनेविषयी कुरघोड्या करणार्‍या सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्यात यावे या विषयावरून दीपक जोशी व संजय नारखेडे यांनी याबाबत हरकत नोंदविली. आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते चांगले काम करणाऱ्या महिला सदस्यांना बेस्ट महिला फार्मसी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज