अ‍ॅपशहर

‘एमआयएम’ बिघडविणार मतांचे गणित?

जळगाव महापालिका निवडणुकीत मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच ‘एमआयएम’ हा पक्ष प्रथमच एन्ट्री करीत आहे. औरंगाबाद महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने जळगाव शहरातील ६ पेक्षा अधिक वॉर्डात उमेदवार देण्याची तयारी केली आहे. यामुळे खान्देश विकास आघाडीसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मुस्लिम वोट बँकेला धक्का बसण्याची चिन्हे असून, राजकारणातील पारंपरिक गणिते बिघडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 10 Apr 2018, 4:00 am
महापालिका निवडणुकीत एन्ट्रीने मुस्लिम वोट बँकेला धक्का
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mim take part in jalgaon municipal corporation election
‘एमआयएम’ बिघडविणार मतांचे गणित?


Pravin.chaudhari@timesgroup.com
Tweet : @pravincMT

जळगाव महापालिका निवडणुकीत मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच ‘एमआयएम’ हा पक्ष प्रथमच एन्ट्री करीत आहे. औरंगाबाद महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने जळगाव शहरातील ६ पेक्षा अधिक वॉर्डात उमेदवार देण्याची तयारी केली आहे. यामुळे खान्देश विकास आघाडीसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मुस्लिम वोट बँकेला धक्का बसण्याची चिन्हे असून, राजकारणातील पारंपरिक गणिते बिघडण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जरी सुरू झालेली नसली तरी तयारी मात्र सर्वच पक्षांनी सुरू केलेली दिसून येत आहे. महापालिका राजकारणातील पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. खान्देश विकास आघाडी, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीसह काँग्रेसनेदेखील निवडणुकीच्या आखाड्यात तयारीनिशी येणार असल्याचे जाहीर केले. यासह समाजवादी पक्ष, बहुजन पार्टी व इतर पक्षांकडूनही वॉर्डांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये आता एमआयएमने उडी घेतल्याने चुरस निर्माण होऊ शकते.

‘एमआयएम’ पूर्ण ताकदीनिशी उतरणार...
पारंपरिक पक्षांसह यंदा प्रथमच खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा ‘एमआयएम’ हा पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती पक्षाचे जळगाव शहराध्यक्ष रैयान जहागिरदार यांनी ‘मटा’शी बोलतांना दिली. जळगाव शेजारील औरंगाबाद महापालिकेत एमआयएमचे २६ नगरसेवक आहेत. तेथे विरोधी पक्षनेताही एमआयएमचा असल्याचे जहागिरदार यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांपासून एमआयएम जळगाव शहरात मुस्लिम, बहुजन व दलित समाजासाठी काम करीत असल्याचेही जहागिरदार म्हणाले.

एकूण सात वॉर्डात चाचपणी
जळगाव महापालिकेच्या नव्या वॉर्ड रचनेनुसार ६ वॉर्डात एमआयएमला चांगली संधी आहे. यामध्ये मास्टर कॉलनी, तांबापुरा, पिंप्राळा हुडको, शिवाजी नगर व काट्या फार्इल परिसरात पक्षाचे प्राबल्य असून, कार्यकर्त्यांची फळी असल्याचे जहागिरदार यांनी सांगितले. जळगाव शहरात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १५ टक्के मुस्लिम व ८ टक्के दलित मते आहेत. त्यामुळे एमआयएमला चांगली संधी असल्याचेही ते म्हणाले. मुस्लिमच नव्हे तर बहुजन व दलित समाजासाठीही एमआयएमने काम केले असून, इतर उमेदवारांना तिकीट देण्याचा विचार आम्ही करू शकतो, असे जहागिरदार यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत समविचारी पक्ष असल्यास त्यांच्याशी युती करण्याबाबत वरिष्ठांच्या विचाराने निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘विकास’ हाच मुद्दा
एमआयएम महापालिका निवडणूक विकास या मुद्यावरच लढविणार आहोत. गेल्या साडेचार वर्षांत जळगाव शहराचा खुंटलेला विकास, २५ कोटींचा निधी येऊनही सत्ताधारी व विरोधकांच्या भांडणात त्याचा विनियोग झाला नाही यासारख्या मुद्यांवर आमचा पक्ष निवडणूक लढविणार आहे. माजी मंत्री सुरेश जैन शिवसेनेचे नेते आहेत. मात्र, शिवसेनेला मुस्लिम समाजाची मते मिळविणे अवघड होत असल्याने त्या सोर्इसाठी महापालिका खान्देश विकास आघाडीच्या नावावर लढविली जाते. मात्र, एमआयएममुळे खाविआच्या मतांमध्ये फूट पडणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज