अ‍ॅपशहर

प्रोसेडिंगच्या माहितीसाठी ​ आमदारांचा अर्ज

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत माजी महापौर रमेश जैन यांनी ‘तर आमदार खासदार निधीतील कामांना मंजुरी देणार नाही’, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी त्या महासभेच्या प्रोसिडिंगची माहिती मागविली आहे.

Maharashtra Times 12 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mla suresh bhole application for proceding book information of jalgaon nmc meeting
प्रोसेडिंगच्या माहितीसाठी ​ आमदारांचा अर्ज


महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत माजी महापौर रमेश जैन यांनी ‘तर आमदार खासदार निधीतील कामांना मंजुरी देणार नाही’, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी त्या महासभेच्या प्रोसिडिंगची माहिती मागविली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव महापालिकेस विकासकामांसाठी २५ कोटींचा निधी दिला असून, या निधीतील कामे ही बांधकाम विभागाकडून करावी, अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली होती. त्यानुसार महापालिकेला दिलेला निधी जिल्हा प्रशासनाकडे पुन्हा वर्ग त्यांच्याकडे वर्ग करून घेतला होता. त्यानुसार ही कामे बांधकाम विभागाकडून होणार होती.

दरम्यान, महापालिकेच्या बुधवारी झालेल्या विशेष महासभेत सत्ताधारी खान्देश विकास आघाडीचे सभागृह नेते रमेश जैन यांनी २५ कोटी रुपयांच्या निधीतील कामे बांधकाम विभागाकडून नव्हे तर महापालिकेकडून करावी, असे सांगितले. जर ही कामे बांधकाम विभागाकडून केली तर मग यापुढे आमदार, खासदार निधीतील कामांना महापालिका मंजुरी देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. रमेश जैन यांच्या वक्तव्यांचा भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकारी निंबाळकर यांना निवेदन देवून निषेध केला. तसेच विधानसभेत आमदार सुरेश भोळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. शुक्रवारी (दि. ११) आमदार सुरेश भोळे यांच्याकडून महापालिकेच्या नगरसचिव विभागातून या महासभेच्या प्रोसेडिंगची माहिती मागवण्यासाठी अर्ज केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज