अ‍ॅपशहर

आमदार भोळेंनी घेतली सुरेश जैन यांची भेट

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वर्षभरात शहराचा विकास करून आश्‍वासन भाजपतर्फे दिले आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी आमदार सुरेश भोळे यांनी माजी आमदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या वेळी जळगाव शहराच्या विकासावर चर्चा केल्याचे आमदार भोळे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

Maharashtra Times 14 Aug 2018, 5:00 am
शहर विकासासह हुडको कर्ज व गाळ्यांवर चर्चा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhole dada bhet news

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वर्षभरात शहराचा विकास करून आश्‍वासन भाजपतर्फे दिले आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी आमदार सुरेश भोळे यांनी माजी आमदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या वेळी जळगाव शहराच्या विकासावर चर्चा केल्याचे आमदार भोळे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

भाजपने वर्षभरात शहराचा विकास करण्याबाबत जळगावकरांना आश्‍वासन दिले आहे. यासंदर्भात शहराचा विकासासाठी सर्वांचेच सहकार्य अपेक्षित असल्याच्या भूमिकेतून आमदार सुरेश भोळे यांनी तीन दिवसांपूर्वी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचीदेखील भेट घेतली. त्यानंतर सोमवारी सुरेश जैन यांची दुपारी १२.५० वाजता आमदार भोळे यांनी भेट घेतली. तब्बल अर्धा तास चाललेल्या या भेटीत हुडको कर्ज, जेडीसीसी बँक कर्ज, गाळे, हॉकर्स आणि शहराचा विकासासंदर्भात चर्चा झाली. शहरविकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर माजी आमदार सुरेश जैन यांनी आमची काहीही अडचण नाही. निश्‍चितच मदत करण्याचे सांगितले. या वेळी नगरसेवक अमर जैन, जितेंद्र मुंदडा, अमोल सांगोळे, प्रमोद नाईक, बाबूशेठ श्रीश्रीमाळ उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज