अ‍ॅपशहर

महापालिकेत बहुतांश कारभारी ‘प्रभारी’

जळगाव महापालिकेत अप्पर आयुक्त सहाय्यक आयुक्तांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या सर्व पदांचा पदभार पालिकेतीलच कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला आहे. बहुतांश कारभारी ‘प्रभारी’ असल्याने प्रशासकीय कामकाजात शिथिलता आली आहे. विशेष म्हणजे, स्थायी समितीच्या मंजुरीने सरकारकडे पाठविण्यात आलेल्या २५८२ पदांच्या आकृतीबंधालाही अद्याप मान्यता मिळाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Maharashtra Times 24 May 2018, 5:00 am
अप्पर आयुक्तांसह महत्त्वाची पदे रिक्त; आकृतीबंध प्रतीक्षेतच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम most of the post will be on in charge officers in jalgaon municipal corporation
महापालिकेत बहुतांश कारभारी ‘प्रभारी’


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव महापालिकेत अप्पर आयुक्त सहाय्यक आयुक्तांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या सर्व पदांचा पदभार पालिकेतीलच कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला आहे. बहुतांश कारभारी ‘प्रभारी’ असल्याने प्रशासकीय कामकाजात शिथिलता आली आहे. विशेष म्हणजे, स्थायी समितीच्या मंजुरीने सरकारकडे पाठविण्यात आलेल्या २५८२ पदांच्या आकृतीबंधालाही अद्याप मान्यता मिळाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सन २००३ मध्ये जळगाव नगरपालिकेला महापालिकेचा दर्जा मिळाला. त्यानंतर क्षेत्र व कार्यभार वाढविण्यात आला होता. प्रशासकीय कामकाजातदेखील बदल झाले होते. महापालिका झाल्यानंतर आस्थापनेतील कर्मचाऱ्यांचा विभागनिहाय आकृतीबंधातदेखील बदल करणे आवश्यक होते. महापालिका झाल्यानंतरही नगरपालिकेच्या मंजूर पदांवरच कामकाजास सुरुवात झाली. त्यामुळे आकृतीबंधाशिवायच गेल्या अकरा वर्षांपासून महापालिकेचे कामकाज सुरू आहे.

या सर्व रिक्त पदांवर पात्र नसलेल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदभार देऊन प्रभारी कारभारी करून काम रेटून नेले जात असल्याचे भयंकर चित्र सध्या दिसून येत आहे. या महिन्याअखेरदेखील सुमारे ४० ते ४५ अधिकारी, कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आता जळगाव महापालिका ही ‘प्रभारी’ कारभाऱ्यांवर चालणारी महापालिका असल्याचे चित्र आहे.

आकृतीबंधाचे काय झाले?
नुकताच आस्थापना अधीक्षक राजेंद्र पाटील हे पदावर असताना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध तयार करण्यात आला होता. तो आकृतीबंध मान्यतेसाठी सभेत ठेवण्यातही आला होता. त्यात दुरुस्ती करीत पदवीधर विधी विभागात शाखाप्रमुख, अधीक्षक, लिपीक व शिपाई यांची पदे वाढविण्यात आली. तसेच नगरसचिव विभागात २ लिपीकही वाढविण्यात आले. प्रभाग समितीमध्ये ४८ ऐवजी ५२ लिपीक, ३७ ऐवजी ५३ शिपाई अशी दुरुस्ती सुचविण्यात आली. तर पदाधिकारी यांच्याकडे वरिष्ठ दर्चाचा लिपीक स्वीय सहाय्यक पद समाविष्ट करण्यात आले होते. महिला व बालकल्याण व प्रभाग समिती सभापतींकडे १ लिपीक व १ शिपाई यांचे पद समाविष्ट करण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर हा आकृतीबंध मंजुरीसाठी सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र, त्याचे पुढे काय झाले ते कळलेच नाही.

महापालिकेत रिक्त असलेली पदे
अप्पर आयुक्तपद...........१
उपायुक्त................१
सहाय्यक उपायुक्त.............३
मुख्य लेखाअधिकारी..........१
मुख्य लेखापरिक्षक.............१
नगरसचिव..............१
आरोग्य अधिकारी............१
वाहन विभागप्रमुख..........१

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज