अ‍ॅपशहर

मोटरसायकल रॅलीने वेधले लक्ष

महाबळ परिसरातील भगवान परशुराम सेवा समिती व बहुभाषिक ब्राह्मण समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान परशुराम जयंतीनिमित्त शहरातून काढण्या मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

Maharashtra Times 28 Apr 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम motar cycle rally in jalgaon
मोटरसायकल रॅलीने वेधले लक्ष


महाबळ परिसरातील भगवान परशुराम सेवा समिती व बहुभाषिक ब्राह्मण समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान परशुराम जयंतीनिमित्त शहरातून काढण्या मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

महाबळ चौकापासून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अॅड. सुशिल अत्रे, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून रॅलीला सुरवात झाली. रॅलीचा यशस्वीतेसाठी परशुराम समितीच्या महाबळ परिसराचे भूपेश कुळकर्णी, किरण कुळकर्णी, प्रवीण कुळकर्णी, राजेश नाईक, नीलेश कुळकर्णी, अमोल जोशी, भूषण मुळे आदींनी परिश्रम घेतले. ही रॅली काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, रिंगरोड, खाँजामिया चौक, कोर्ट चौक, नेहरू चौक, शास्त्री टॉवर मार्गे ब्राह्मण सभे ठिकाणी रॅलीचा समारोप झाला.

मुलींचे ढोलपथक

मोटरसायकल रॅलीत मोठया संख्येने समाजबांधव पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. रॅलीच्या सुरवातीला ढोल ताशा वाजविणाऱ्या १०० मुलींचे पथक होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज