अ‍ॅपशहर

हुडकोविरोधात याचिका

महापालिकेवर हुडकोच्या असलेल्या कर्जापोटी मासिक तीन काेटी रुपयांचा हफ्ता भरला जात आहे. या हफ्त्याला स्थगिती मिळण्यासाठी मनपा आयुक्त जीवन सोनवणे बुधवारी (दि. १५) मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.

Maharashtra Times 16 Mar 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम muncipal commisioner appeals at highcourt against hudco
हुडकोविरोधात याचिका


महापालिकेवर हुडकोच्या असलेल्या कर्जापोटी मासिक तीन काेटी रुपयांचा हफ्ता भरला जात आहे. या हफ्त्याला स्थगिती मिळण्यासाठी मनपा आयुक्त जीवन सोनवणे बुधवारी (दि. १५) मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. महापालिकेवर हुडकोचे व्याजासह सुमारे सहाशे ‌कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जफेडीसाठी महापालिकेकडून दरमहा तीन कोटी रुपयांचा हफ्ता भरला जातो. हुडकोला एकरकमी परतफेडीसाठी महापालिकेने याअगोदर प्रस्ताव दिला होता. हुडकोने त्या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या‌ याचिकेत हुडको जोपर्यंत कर्जाचा हिशेब देत नाही तोपर्यंत हा दरमहाचा तीन कोटी रुपयांचा हफ्ता स्थगित करावा, अशी मागणी हायकोर्टाला आयुक्त जीवन सोनवणे यांनी या याचिकेद्वारे केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज