अ‍ॅपशहर

illegal sand mining: अधिकाऱ्यानी हटकले; वाळू चोरांनी चालत्या ट्रॅक्टरमधून टाकल्या उड्या अन्...

अवैध वाळू वाहुन नेणारे ट्रॅक्टर रस्त्याने जाणारे पाचोऱ्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांना दिसताच त्यांनी त्यास हटकले. मात्र ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालते ट्रॅक्टर तसेच सोडून पळ काढला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2020, 6:03 pm
जळगाव: अवैध वाळू वाहुन नेणारे ट्रॅक्टर रस्त्याने जाणारे पाचोऱ्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांना दिसताच त्यांनी त्यास हटकले. मात्र ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालते ट्रॅक्टर तसेच सोडून पळ काढला. त्यावेळी प्रांत कचरे यांच्या वाहनाच्या चालकाने प्रसंगावधान ठेवत चालते ट्रॅक्टर थांबवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sand mining


पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे हे मंगळवार दि. २५ रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास शासकीय वाहनाने कोविड सेंटर, बांबरूड (ता. पाचोरा) येथे जात असतांना पाचोरा-भडगाव रस्त्यावर पुनगाव हद्दीत एका हॉटेलच्या जवळ समोरून येतांना एक वाळूने भरलेले स्वराज कंपनीचे लाल रंगाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर दिसले. हे ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतुक करीत असल्याचा प्रांत कोचरे यांना संशय आल्याने त्यांनी ट्रॅक्टर चालकास वाहनातील ध्वनीक्षेपकावरून थांबण्याचा इशारा केला. मात्र ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर न थांबवता मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजुस ट्रॅक्टर उतरवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. प्रांत कोचरे यांनी शासकीय वाहनाने या ट्रॅक्टरचा पाठलाग केला असता ट्रॅक्टर चालकाने चालू ट्रॅक्टरवरून उडी मारून पळ काढला.

वेळीच दुर्घटना टळली

त्यावेळी ट्रॅक्टर विना चालक पळत होते समोर अंदाजे १०० मीटर अंतरावर एक निवासी घर होते. काही मुले घराच्या अलीकडे उभी होती. त्यांच्या जीवीतास धोका निर्माण होवू नये म्हणून प्रांत कचरे यांच्या शासकीय वाहनावरील चालक अजीजबेग अन्वरबेग मिर्झा यांनी पळत जावून चालू ट्रॅक्टरवर चढून ब्रेक दाबून हे ट्रॅक्टर थांबवले.त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी प्रांतधिकारी राजेंद्र कचरे यांच्या तक्रारीवरून चालक (नाव, गाव माहित नाही) याचे विरूद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला बेदरकारपणे वाहन चालवून नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण करणे, ते चालू स्थितीत सोडून पळ काढणे, वाळूची चोरी करून वाहतुक करणे व विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉली वापरणे आदी बेकायदा कृत्यांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज