अ‍ॅपशहर

गांधीयन लीडरशिप कॅम्प आजपासून

युवावर्गात गांधीयन नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने गांधीतीर्थ येथे आज (दि. २६ सप्टेंबर) ते ५ ऑक्टोबरदरम्यान ‘नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प’आयोजित करण्यात आलेला आहे.

Maharashtra Times 26 Sep 2018, 5:00 am
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम national gandhiyan leadership camp start today at jalgaon gandhi teerth
गांधीयन लीडरशिप कॅम्प आजपासून


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

युवावर्गात गांधीयन नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने गांधीतीर्थ येथे आज (दि. २६ सप्टेंबर) ते ५ ऑक्टोबरदरम्यान ‘नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प’आयोजित करण्यात आलेला आहे.

महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी अर्थात ‘बा-बापू १५० व्या जयंती’ वर्षाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन आज (दि. २६) सकाळी ११.०० वाजता महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक सेवादास दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कॅम्पसाठी भारतातील २० राज्यांतील तसेच नेपाळ असे दोन्ही मिळून सुमारे ६५ युवक-युवतींचा सहभाग आहे.

या कार्यक्रमात मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त सोनम वांगचूक यांच्यासोबत उपस्थितांना सुसंवाद साधता येणार आहे. ‘अनुकूल जीवनशैली’ याबाबत ते संवाद साधणार असून, ‘गांधी प्रासंगिकता का मर्म’ या विषयावर लेखक डॉ. विश्वास पाटील हे संवाद साधतील. ‘सत्य और अहिंसा के प्रकाश में खुद को जाने’ यावर प्रा. एम. पी. मथाई, ‘आज के संदर्भ में शाश्वत पर्यावरण का प्रारूप’ याबाबत संपादक डॉ. दिलीप कुलकर्णी, ‘गांधीवादी आर्थिक विचारधारा’ याबद्दल डॉ. निमिषा शुक्ल विचार मांडतील. ‘सामाजिक सद्भावना’ याविषयी जावेद आनंद मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय तुषार गांधी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, डॉ. जॉन चेल्लादुरई हेदेखील युवक-युवतींशी सुसंवाद साधणार आहेत. या कॅम्पचा दैनंदिन कार्यक्रम पहाटे सव्वा पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत असून, त्यात योग, प्राणायम, श्रमसंस्कार, कृषी, गोशाळा, परिसर स्वच्छता, पक्षीदर्शन, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज