अ‍ॅपशहर

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे आचारसंहितेबाबत निवेदन

जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपतर्फे करण्यात येणाऱ्या आचारसंहिता भंगाबाबतची दखल घ्यावी. तसेच संबंधितांवर चौकशीअंती गुन्हा दाखल करीत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत डांगे यांच्याकडे केली.

Maharashtra Times 19 Jul 2018, 4:00 am
जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपतर्फे करण्यात येणाऱ्या आचारसंहिता भंगाबाबतची दखल घ्यावी. तसेच संबंधितांवर चौकशीअंती गुन्हा दाखल करीत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत डांगे यांच्याकडे केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nationalist congress party leaders letter to municipal corporation commissioner on code of conduct issue
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे आचारसंहितेबाबत निवेदन

याबाबत त्यांनी एक निवेदन आयुक्तांना दिले. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतचा हा शासन निर्णय पूर्वीच झालेला असताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: व मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकून जामनेरच्या नावाने वर्तमानपत्रात जाहिरात दिली. यामुळे विशिष्ट समाजाचे मते मिळविण्यासाठीचा हा भाग जाणवतो, असे नमूद करण्यात आलेले आहे. यावरून आदर्श आचारसंहिता भंग केल्याचे स्पष्ट होते त्यामुळे गुन्हा दाखल व्हावा तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या अनेक मिटिंग घेणेसुद्धा गुन्हाच आहे. या सर्व विषयांची माहितीचे सविस्तर निवेदन बुधवारी देण्यात आले. यावर कार्यालयीन सचिव संजय चव्हाण, सोपान पाटील, कल्पिता पाटील, रोहन सोनवणे, मधुकर सोनवणे, अरविंद मानकरी, गणेश निंबाळकर, चंद्रकांत चौधरी, राहुल जोशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज