अ‍ॅपशहर

‘उमवि’ला एनएसएससाठी तीन राज्यस्तरीय पुरस्कार

महाराष्ट्र सरकारचे सन २०१६-१७ चे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये प्रा. सत्यजित साळवे, डॉ. सचिन नांद्रे तर पूजा चावडा या विद्यार्थिनीचा समावेश आहे.

Maharashtra Times 20 Jun 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम north maharashtra university receives three state award for nss
‘उमवि’ला एनएसएससाठी तीन राज्यस्तरीय पुरस्कार

महाराष्ट्र सरकारचे सन २०१६-१७ चे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये प्रा. सत्यजित साळवे, डॉ. सचिन नांद्रे तर पूजा चावडा या विद्यार्थिनीचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले जातात. शनिवारी (दि. १७) हे पुरस्कार राज्य सरकारने जाहीर केले आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम समन्वयक प्रा. सत्यजित साळवे यांना कार्यक्रम समन्वयक प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार जाहीर झाला आहे. दहिवेल ता. साक्री, जि. धुळे येथील उत्तमराव पाटील महाविद्यालयाचे डॉ. सचिन नांद्रे यांना कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार जाहीर झाला. तर अक्कलकुवा येथील आर. एफ. एन. एस. महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूजा चावडा हिला सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार जाहीर झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज