अ‍ॅपशहर

थकीत करांसाठी महापालिकेला नोटीस

महानगरपालिकेकडे अकृषककर, रोजगार हमी, आणि शिक्षण करापोटी १४ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी तहसील कार्यालयाने मनपा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. थकबाकी न भरल्यास जप्तीच्या इशारादेखील देण्यात आला आहे.

Maharashtra Times 13 Mar 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम notice to jalgaon municipal corporation for pending taxes by revenue department
थकीत करांसाठी महापालिकेला नोटीस


महानगरपालिकेकडे अकृषककर, रोजगार हमी, आणि शिक्षण करापोटी १४ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी तहसील कार्यालयाने मनपा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. थकबाकी न भरल्यास जप्तीच्या इशारादेखील देण्यात आला आहे.

महानगरपालिकेची आर्थिकस्थिती बिकट असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अनेक देणी थकली आहेत. वीजबिलापोटी महावितरणची थकबाकी असल्यामुळे ८ ते १० दिवसांपूर्वी महावितरणने मनपा प्रशासनाला नोटीस बजावली होती. त्यापाठोपाठ आता अकृषक कर, रोजगार हमी आणि शिक्षण करापोटी १४ कोटीची थकबाकी असल्यामुळे तहसील कार्यालयाने मनपाला नोटीस बजावली आहे. शहरातून गेलेल्या महामार्ग तसेच समांतर रस्त्यांचा काम करण्यासाठी महामार्गालगत व समांतर रस्त्यावरील पून्हा झालेले अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली जाणार आहे. याबाबत ‘न्हाई’, जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची आज (दि. १३) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज