अ‍ॅपशहर

जळगावमध्येही शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, दोघांवर गुन्हा दाखल

सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवारांची बदनामी करण्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांने या प्रकरणी तक्रार केली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2022, 2:33 pm
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. हे प्रकरण ताजं असताना आता जळगाव जिल्ह्यात फेसबुकवर शरद पवार यांचा फोटो अपलोड करुन त्यावर अश्लिल व आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम offensive posts on social media against sharad pawar police case registered
जळगावमध्येही शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल


राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची बदनामी केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी दोन जणांविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो फेसबुकवर शेअर केला. त्या फोटोवर आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यावर एकाने अश्लिल भाषेत शिवीगाळ, बदनामीकारक कमेंट केल्याचं समोर आलं. याचून शरद पवार यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी शनिवारी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अंकित प्रल्हाद पाटील आणि हरीश कोळी या नावाने फेसबुक खाते असलेल्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर तायडे हे करत आहेत.

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान मोदींचे दास; नितीन राऊतांची टीका

'अभिनेत्री केतकी चितळेला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या केतकी चितळे यांच्याविरोधात जळगावतही राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. केतकी चितळेला ठाण्यातील वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावं आणि जळगावातील पोलिसात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणही राष्ट्रवादीच्या पदाधिकारी महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांनी पोलिसांना निवेदनही दिलं आहे.

महत्वाचे लेख