अ‍ॅपशहर

इमारतीवरून पडून मजूराचा मृत्यू

शहरातील शिवाजीनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचे काम करताना लाकडी पाटी घसरून ३८ वर्षीय मजूर खाली पडला. त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली. मजुराला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ७) सकाळी घडली.

Maharashtra Times 8 May 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one construction labor death due to down at new construction building site
इमारतीवरून पडून मजूराचा मृत्यू

शहरातील शिवाजीनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचे काम करताना लाकडी पाटी घसरून ३८ वर्षीय मजूर खाली पडला. त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली. मजुराला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ७) सकाळी घडली.

खंडेराव नगरात राहणारे इक्बाल फकिरोद्दिन पिंजारी हे सोमवारी सकाळी शिवाजीनगर परिसरात एका इमारतीच्या बांधकाम ठिकाणी काम करीत होते. ९.१५ वाजेच्या सुमारास लोखंडी रेलिंगवर ठेवलेली लाकडी पाटी घसरल्याने ते पहिल्या मजल्यावरून खाली पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नातेवाइकांचा आक्रोश
घटनेची माहिती कळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मृत इक्बाल यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. इक्बाल यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज