अ‍ॅपशहर

शेतातील विहिरीत पडून बालिका जखमी

पथराड गावाजवळ असलेल्या शेतात मंदाकिनी सुभाष तरस (वय १५) ही आपल्या आई-वडिलांसोबत कामाला गेली होती. शेतातील ७० फूट खोल विहिरीतून पाणी काढत असताना मंदाकिनी तोल जाऊन विहिरीत पडली. वडील सुभाष तरस यांनी लागलीच विहिरीत उडी मारत मुलीचे प्राण वाचविले.

Maharashtra Times 30 Jun 2016, 1:06 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one dead in jalgaon
शेतातील विहिरीत पडून बालिका जखमी

पथराड गावाजवळ असलेल्या शेतात मंदाकिनी सुभाष तरस (वय १५) ही आपल्या आई-वडिलांसोबत कामाला गेली होती. शेतातील ७० फूट खोल विहिरीतून पाणी काढत असताना मंदाकिनी तोल जाऊन विहिरीत पडली. वडील सुभाष तरस यांनी लागलीच विहिरीत उडी मारत मुलीचे प्राण वाचविले.

चौघांना सर्पदंश

पाळधी येथील रहिवासी जयसिंग पावरा (२८) हे शेतात काम करीत असतांना त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आलेल्या सापाने चावा घेतला. धरणगांव तालुक्यातील काकडी गावातील चंद्रकांत ज्ञानेश्वर सोनवणे (२७), राणीचे बांबरूड येथील युवराज दौलत वाघ (४५), भारूळखेडा येथील नारायण पाटील (३२) यांनादेखील सापाने चावा घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज