अ‍ॅपशहर

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाचा मृत्यू

पिंप्राळातील कापसे गल्लीतील १९ वर्षीय तरुणाचा मॉर्निंग वॉकदरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे बजरंग बोगद्याजवळ घडली. या तरुणाच्या लहानपणीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याला आईने वाढविले होते. अविनाश जगन हटकर (वय १९) असे या तरुणाचे नाव आहे.

Maharashtra Times 17 Oct 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one dead in jalgaon
मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाचा मृत्यू


पिंप्राळातील कापसे गल्लीतील १९ वर्षीय तरुणाचा मॉर्निंग वॉकदरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे बजरंग बोगद्याजवळ घडली. या तरुणाच्या लहानपणीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याला आईने वाढविले होते. अविनाश जगन हटकर (वय १९) असे या तरुणाचे नाव आहे.

लहानपणापासून अविनाशला देशसेवेची आवड होती. तो दीड महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. अविनाश व त्याच्या आईची जबाबदारी अविनाशचा मामा रामदास पाटील यांनी स्वीकारली. पिंप्राळा येथील कापसे गल्लीत मामासमवेत अविनाश व त्याची आई मंगलाबाई राहात. लष्करात जायचे अविनाशनचे लहानपणापासून स्वप्न होते. त्याच्या तयारीसाठी तो पहाटे लवकर उठून मॉर्निंग वॉकला जायचा. रविवारी, अविनाश नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. सकाळी पावणेसहा वाजता बजरंग बोगद्याजवळ खांब क्रमांक ४१७/३०-३२ जवळ रेल्वे रूळ ओलांडताना अविनाशचा दुर्दैवी मृत्यू झाला.

एकाला अटक

अजिंठा चौफुली येथे पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या स्विफ्ट कारमधून चोरट्यांनी ५४ लाख रुपये असलेली बॅग चोरून नेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. संशयितांच्या चौथ्या साथीदारास अहमदनगर कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतलेे. रविवारी त्यास कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अतुल सुरेशचंद्र कोठारी (रा. जामनेर) यांच्या कारची काच तोडून संशयितांनी ५४ लाख रूपये असलेली बॅग चोरून नेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी रवींद्र होळकर, आशिष बागडे व दुर्गाप्रसाद पस्कुलेटी यांना अटक केली होती. त्यांचा चौथा साथीदार भास्कर सरवई (वय ४७, रा. तामिळनाडू) यास अहमदनगर कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज