अ‍ॅपशहर

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

गाडेगावातील सुप्रीम कंपनी येथील लेखापाल कंपनीमध्ये कामावर जात असताना मागून भरधाव येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Maharashtra Times 27 Dec 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one man dead in truck accident at jalgaon
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


गाडेगावातील सुप्रीम कंपनी येथील लेखापाल कंपनीमध्ये कामावर जात असताना मागून भरधाव येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २६) सकाळी साडेआठ वाजता जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील शिल्पा फर्निचरसमोर घडली. ही धडक इतकी जबर होती की, डोक्यावर हेल्मेट असतानाही दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. प्रमोद सुरेश महाजन (वय ४०, रा. आसोदा) असे मृत कामगाराचे नाव आहे.

असोदा येथील रहिवासी प्रमोद महाजन गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीत लेखापाल या पदावर कार्यरत होते. प्रमोद महाजन नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी कंपनीत जाण्यासाठी मोटार सायकलने (एमएच १९ सीटी २९३६) निघाले होते. शहरातील अजिंठा चौफुली ओलांडल्यानंतर शिल्पा फर्निचर समोरून जात असताना मागून भरधाव वेगात येणार्‍या ट्रकने (एमएच १८ एए ८०३६) त्यांना जबर धडक दिली. यातच ते ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे प्रमोद महाजन यांनी डोक्यात हेल्मेट घातले होते. परंतु, डोक्यावरून ट्रकचे मागचे चाक गेल्याने डोक्याला जबर फटका बसला होता. अपघातानंतर हेल्मेट तसेच राहिले होते. डोक्याला बसलेल्या फटक्यामुळे रक्त गोठले जावून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोटार सायकलचेही यात नुकसान झाले आहे. अपघातानंतर चालक ट्रक घेऊन पसार झाला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून रेमंड चौफुली येथे पकडून ट्रकचालक अमोल देशमाने यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महामार्गावर अपघात झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच शरद भालेराव, संजय धनगर, गोविंदा पाटील या पोलिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने महाजन यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज