अ‍ॅपशहर

श्री गणेश आरासची ऑनलाइन स्पर्धा

पीपीआरएल हाऊसिंग डॉट कॉमतर्फे गणेश महोत्सवाच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाइन ‘श्री गणेश आरास स्पर्धा-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra Times 20 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम online competition for lord ganesha festival decoration
श्री गणेश आरासची ऑनलाइन स्पर्धा


पीपीआरएल हाऊसिंग डॉट कॉमतर्फे गणेश महोत्सवाच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाइन ‘श्री गणेश आरास स्पर्धा-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. याप्रकारची ही पहिलीच स्पर्धा असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळे लोकजागर करताना समाज प्रबोधनात्मक आरास करतात. सध्या जगभरात डिजिटलायझेशनचे युग सुरू आहे. मंडळाची आरास देश-विदेशातील भाविकांपर्यंत ऑनलाइनच्या माध्यमातून या स्पर्धेतून पोहचविण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांची निवड जनतेच्या मतदानातून होणार आहे, असेही आयोजकांनी सांगितले.

या स्पर्धेत मेट्रो शहरांसह, जिल्हे, तालुके ते गावांपर्यंत सर्वच गणेश मंडळांना ऑनलाइन स्पर्धेत सशुल्क भाग घेता येणार आहे. २५ लाखापर्यंतच्या एकूण ७५५ बक्षिसे या सोबत जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी दि. २० ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०१७ या कालावधीत गणेश मंडळांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी PPRLHOUSING.COM च्या साइट वर भेट देवून मंडळाचे रजिस्ट्रेशन करता येणार आहे. स्पर्धेत मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विनय पारख यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज