अ‍ॅपशहर

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

महापालिकेसमोरील विकास बिर्ला या रेल्वे तिकिट काढणार्‍या एजंटचा तिकिटांचा काळाबाजार रेल्वे पोलिसांनी गेल्या महिन्यात उघड केला होता. बुधवारी (दि.२४) पुन्हा जळगावातील बालाजी पेठेतून एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे. मुंबई, जळगाव, भुसावळ पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. त्यामुळे रेल्वे बुकींमध्ये खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 25 May 2017, 4:00 am
मुंबई, जळगाव, भुसावळ पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम online railway ticket balck market at jalgaon police action on them
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेसमोरील विकास बिर्ला या रेल्वे तिकिट काढणार्‍या एजंटचा तिकिटांचा काळाबाजार रेल्वे पोलिसांनी गेल्या महिन्यात उघड केला होता. बुधवारी (दि.२४) पुन्हा जळगावातील बालाजी पेठेतून एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे. मुंबई, जळगाव, भुसावळ पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. त्यामुळे रेल्वे बुकींमध्ये खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील नवीपेठमध्ये राहत असलेल्या विकास केदारनाथ बिर्ला यांच्या जळगाव मनपासमोर निखील एजन्सी दुकानामध्ये रेल्वेचा आयपी बदलवून बनावट तिकिट चढ्या भावाने विकले गेल्याने त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर जप्त करण्यात आले आहे. या वेळी सुमारे ५१,५०० रुपयांची २४ तिकिटे जप्त करण्यात आली होती.

बुधवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता अचानक मयूर सोनी यांच्या बालाजी पेठमधील दुकानावर छापा टाकण्यात आला. मुंबई, जळगाव व भुसावळच्या पोलिस पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये मयूर सोनी यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून झेरॉक्स मशिन, लॅपटॉप, प्रिंटर, संशयास्पद वाटणारा डाटा तसेच काऊंटर व करंट असे ८ ते १० तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

रेल्वे पोलिसांची संयुक्त कारवाई

शहरामध्ये बनावट आयडी तयार करून प्रवाशांना वाढीव दराने आरक्षित तिकिट उपलब्ध करून देत असल्याची माहिती मुंबई येथील मुख्य सतर्कता निरीक्षक अतुल क्षिरसागर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी भुसावळ वाणिज्य विभागाचे प्रशांत ठाकूर, सीबीआयचे अतुल टोके, जळगाव रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ सोनुने यांना याबाबत माहिती दिली. पोलिस निरीक्षक कुलदीप सिंग, पोलिस उपनिरीक्षक फरियाद खान यांच्या पथकाने जळगावातील बालाजी पेठमधील तिरूपती टूर्स ट्रॅव्हल्स आणि रेल्वे ई-टिकट या दुकानावर अचानक छापा टाकला. सोनी यांच्या दुकानातून जप्त करण्यात आलेल्या तिकिटांपैकी काही तिकिटे रद्द करण्याच्या हालचालीही सुरू होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज