अ‍ॅपशहर

परिवर्तनतर्फे ‘गोष्टरंग’चे आयोजन

परिवर्तन नाट्य संस्थतर्फे २२ ते २४ ऑगस्ट या कालावधीत खान्देशामधील शालेय विद्यार्थ्यासाठी 'गोष्टरंग' हा नाटकातून साहित्य व नाटक याची ओळख शहरी व ग्रामीण मुलांना करून देण्यात येणार आहे.

Maharashtra Times 22 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parivartan drama in jalgaon
परिवर्तनतर्फे ‘गोष्टरंग’चे आयोजन


परिवर्तन नाट्य संस्थतर्फे २२ ते २४ ऑगस्ट या कालावधीत खान्देशामधील शालेय विद्यार्थ्यासाठी 'गोष्टरंग' हा नाटकातून साहित्य व नाटक याची ओळख शहरी व ग्रामीण मुलांना करून देण्यात येणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी व अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या 'क्वेस्ट' या संस्थेबरोबर 'परिवर्तन गोष्टरंग' हा उपक्रम खान्देशामध्ये राबवणार आहे. जळगाव, चोपडा, धुळे येथे हा उपक्रम ३ दिवसांत ६ नाट्य प्रयोग असा राबण्यात येणार आहे. 'क्वेस्ट' ही लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारी संस्था आहे.

बाल साहित्यामधील सहा दर्जेदार आणि मनोरंजक गोष्टी निवडून यापैकी एका वेळेस कोणत्याही तीन गोष्टी सादर केल्या जातात. उपलब्ध जागा आणि समोरील प्रेक्षक वर्गाचे वय लक्षात घेऊन तीन गोष्टी सादर केल्या जातात. तिन्ही गोष्टींचा एकूण सादरीकरण कालवधी एक ते सव्वा तास असून कोणत्याही मोकळ्या किंवा बंदिस्त जागेत या गोष्टींचा प्रयोग करता येतो. प्रयोग गोलात मध्यभागी सादर होतो आणि बालप्रेक्षक त्याच्या भवताली बसलेले, अशी मंचरचना असते. संगीतासाठी ध्वनिवर्धक योजना एवढ्याच तांत्रिक बाबींची आवश्यकता असते.

या आहेत सहा गोष्टी

दोन कुत्र्यांची गोष्ट, इटकू पिटकू आकाशवाणीवर, का का कुमारी, बाबाच्या मिशा, अली बजरंग बली बनतो तेव्हा, कण्णा पण्णा या सहा गोष्टी सादर केल्या जाणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज