अ‍ॅपशहर

चिमुकल्यांनी गजबजली शालेय साहित्याची दुकाने

सुट्यांमध्ये मनसोक्त आनंद लुटलेल्या बालकांना आता शाळेची पहिली घंटा कधी पडेल, याची उत्सुकता लागली आहे. अवघ्या तीन दिवसांतच म्हणजे येत्या १५ जून रोजी शाळा सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय साहित्याच्या खरेदीसाठी बुक डेपो, स्टेशनरी दुकाने नवसाहित्यांनी गजबजली आहेत. शहरातील काही बुक डेपोंवर सकाळपासूनच पुस्तकांच्या खरेदीसाठी पालकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Maharashtra Times 13 Jun 2018, 5:00 am
कार्टून्सच्या वॉटरबॅग्स, दप्तरांना मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम peoples goes to school bags water bags purchasing in jalgaon city shops
चिमुकल्यांनी गजबजली शालेय साहित्याची दुकाने

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

सुट्यांमध्ये मनसोक्त आनंद लुटलेल्या बालकांना आता शाळेची पहिली घंटा कधी पडेल, याची उत्सुकता लागली आहे. अवघ्या तीन दिवसांतच म्हणजे येत्या १५ जून रोजी शाळा सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय साहित्याच्या खरेदीसाठी बुक डेपो, स्टेशनरी दुकाने नवसाहित्यांनी गजबजली आहेत. शहरातील काही बुक डेपोंवर सकाळपासूनच पुस्तकांच्या खरेदीसाठी पालकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

दीड ते पावणेदोन महिन्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर आता शाळेत जाण्यासाठी बच्चे कंपनी आतूर झाली आहे. मात्र या बच्चेकंपनी नवी शाळा तसेच नवे दप्तर, कंपास पेटी, कलरफूल वॉटरबॅग, लंच बॉक्स हेदेखील खरेदी करावयाचे यासाठी पालकांकडे हट्ट करत आहेत. अगदी ज्युनिअर केजीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या आकारात, रंगबेरंगी दप्तर विक्रीसाठी दुकानांसमोर दिसून येत आहेत. अलिकडे आठवी ते दहावीतील विद्यार्थी हे कॉलेज बॅगच वापरत असल्याने वजनाने कमी असलेल्या बॅग्जचे आकर्षण आहे. शालेय साहित्यांच्या किमतीत फारशी वाढ नसल्याने पालकवर्गांमध्येही आनंद दिसून येत आहे.

दप्तरांवर अवतरले कार्टून्स
टीव्हीवरील कार्टून प्रत्यक्षात दप्तरावर आले आहेत. बाजारात यंदा चमकदार थ्रीडी दप्तरांमध्ये वैविध्य दिसून येत आहे. यात बार्बी, डोरेमन, वाघ, सिंह, ससा याशिवाय रंगलेल्या पाना-फुलांच्या चित्रांचाही समावेश आहे. ‘डिझ्ने’ या थ्रीडी पिक्चरमध्ये संपूर्ण जंगलातील पात्र एकत्रित करण्यात आले आहे. केवळ दप्तरावरच नाही वॉटरबॅग, टिफिनवरही कार्टून्स प्रामुख्याने दिसून येत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज