अ‍ॅपशहर

उमविची पेट परीक्षा २३ सप्टेंबरपासून

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षा दि.२३ ते २५ सप्टेंबर, २०१७ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने जी.एच.रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtra Times 23 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम phd entrance test at north maharashtra university on 23 september
उमविची पेट परीक्षा २३ सप्टेंबरपासून

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षा दि.२३ ते २५ सप्टेंबर, २०१७ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने जी.एच.रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

पेट परीक्षेसाठी एकूण ३३७९ विद्यार्थी ५० विषयांच्या परीक्षेकरिता पात्र ठरले आहेत. या परीक्षेसाठी हॉल तिकीट यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या आयडीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले असून, त्यावर आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ही परीक्षा सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे संशोधन व विकास विभागाचे विशेष कार्य अधिकारी प्रा. पी. पी. माहुलीकर यांनी कळविले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज