अ‍ॅपशहर

मुक्ताईनगर नगरपंचायतींसाठी १५ जुलै रोजी मतदान

पुणे जिल्ह्यातील भोर या नगरपरिषदेची मुदत संपल्याने तर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा आणि मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायतीसाठी तसेच विविध ११ नगरपरिषदा, नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १५ जुलै रोजी मतदान होणार आहे.

Maharashtra Times 17 Jun 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम polling for muktainagar nagar panchayats on july 15
मुक्ताईनगर नगरपंचायतींसाठी १५ जुलै रोजी मतदान

पुणे जिल्ह्यातील भोर या नगरपरिषदेची मुदत संपल्याने तर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा आणि मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायतीसाठी तसेच विविध ११ नगरपरिषदा, नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १५ जुलै रोजी मतदान होणार आहे.

या निवडणुकीसाठीची मतमोजणी दि. १६ जुलै रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील भोर नगरपरिषदेची मुदत संपत आहे. त्याचबरोबर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा; तर मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायती आहेत. शेगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राकरितादेखील मतदान होत आहे. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींबरोबरच पोटनिवडणूक होत असलेल्या संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी बोलताना दिली.

निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्रे सादर करणे - १९ ते २५ जून
नामनिर्देशनपत्रांची छाननी - २६ जून
अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे - २ जुलै
मतदानाची दिनांक - १५ जुलै
मतमोजणी - १६ जुलै

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज