अ‍ॅपशहर

रेशन दुकानदारांना ‘पीओएस’चे वितरण

डिजिटल इंडिया या पद्धतीने जनता व्यवहार करीत असून, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, रुपे कार्ड, किसान कार्ड यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बुधवारी अल्पबचत सभागृहात केले. जिल्हा पुरवठा विभागातर्फे लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत इ-पीओएस मशिनचे प्रशिक्षण देऊन वाटप कार्यक्रम झाला.

Maharashtra Times 23 Jun 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pos machines distributes to ration shoppers jalgaon
रेशन दुकानदारांना ‘पीओएस’चे वितरण

डिजिटल इंडिया या पद्धतीने जनता व्यवहार करीत असून, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, रुपे कार्ड, किसान कार्ड यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बुधवारी अल्पबचत सभागृहात केले. जिल्हा पुरवठा विभागातर्फे लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत इ-पीओएस मशिनचे प्रशिक्षण देऊन वाटप कार्यक्रम झाला.

यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, पुरवठा विभागाचे हरीमकर, ओयासीस कंपनीचे महाव्यवस्थापक जी. रामलिंगा रेड्डी, प्रशिक्षक राजेंद्र नजर भागवाले, तहसीलदार अमोल निकम उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी एकूण १९०० मशिनचे वाटप करण्यात येणार असून २४ जून पर्यंत मशीन वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यानी सांगितले. कार्यक्रमात काही दुकानदारांना मशिनचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन जमनादास भाटिया यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज