अ‍ॅपशहर

गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव

मुलांना नग्न करून मारहाण करणाऱ्या संशयितांच्या नातेवाइकांनी पीडितांच्या कुटुंबीयांचे अपहरण करून त्यांना जळगाव येथे आणून कागदांवर अंगठे घेतले. तसेच गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणल्याची माहिती पीडितांच्या कुटुंबीयांनी दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी (दि. १८) पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, तसेच हे प्रकरण मिटल्याचे सांगणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे.

Maharashtra Times 19 Jun 2018, 4:00 am
वाकडीच्या पीडित कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांना माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nabab mlik 1 - Copy


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मुलांना नग्न करून मारहाण करणाऱ्या संशयितांच्या नातेवाइकांनी पीडितांच्या कुटुंबीयांचे अपहरण करून त्यांना जळगाव येथे आणून कागदांवर अंगठे घेतले. तसेच गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणल्याची माहिती पीडितांच्या कुटुंबीयांनी दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी (दि. १८) पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, तसेच हे प्रकरण मिटल्याचे सांगणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे.

वाकडी गावात विहिरीत पोहल्यामुळे दोन मुलांना विवस्त्र करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत. सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पीडित कुटुंबीयाच्या भेटीस आले होते. या वेळी त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत विचारपूस केली.

धमकी देत दबाव टाकला
या वेळी पीडित मुलाच्या आईने नवाब मलिकांसमोर सांगितले की, आम्हाला लिहिता वाचता येत नाही. एकेदिवशी आरोपींच्या नातेवाइकांनी आम्हाला जळगाव येथे घेऊन गेले व बळजबरीने आमचे अंगठे घेऊन प्रसार माध्यमांसमोर आम्हाला खोटे बोलायला लावले. तसेच गुन्हा मागे न घेतल्यास विहिरीतील चार पंप व ठिबक नळ्या चोरल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचेही पीडित मुलाच्या आर्इने सांगितले.

याबाबत नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पीडित कुटुंबीयांना दबावतंत्राचा वापर करून प्रकरण मिटविण्यासाठी खोटी माहिती प्रसारमाध्यमांकडे सांगण्यास भाग पाडणाऱ्या आरोपीच्या ‘त्या’ काकांसह यात सहभागी लोकांवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक व्हावी. जेणेकरून गुन्ह्याचा तपास पारदर्शक करता येईल, अशी मागणी मलिक यांनी पोलिस प्रशासनास केली आहे. ते म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्रात असल्या प्रकारचे कृत्य अत्यंत वेदनादायी असून, झालेल्या प्रकाराने समाजमन सुन्न झाले आहे. आरोपींना कडक शासन झाले पाहिजे. भाजप सरकार जाती-जातींमध्ये दुही निर्माण करून कुटील डाव रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाच्या बाबतीत, धुळे येथील धर्मा पाटील यांच्या मुलावर ज्या पद्धतीने सरकारकडून दबाव आणण्यात आला, तशाच प्रकारचा दबाव भाजप सरकारकडून या पीडित कुटुंबीयांवर टाकला जात आहे. यापुढे भाजपच्या एकाधिकारशाहीविरुद्ध आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते सुरजसिंग घुगर, ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीस सविता बोरसे, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्या प्रमिला पाटील, किशोर पाटील, प्रल्हाद बोरसे, अभिषेक पाटील उपस्थित होते.

महाजनांचीही चौकशी करा
वाकडीला भेट दिल्यानंतर प्रवक्ते मलिक यांनी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे वाकडी येथे गेले. मात्र, त्यांनी तेथेच विहिरीवर पत्रकारांशी बोलताना हे प्रकरण मिटले असल्याची माहिती दिली. महाजन यांनी अशाप्रकारे घेतलेली भूमिकाही संशयास्पद आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांच्या या भूमिकेचीदेखील चौकशी करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज