अ‍ॅपशहर

पोलिओ मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत येत्या दि. ११ मार्च रोजी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. विशेषत: ग्रामीण व अतिजोखमीच्या भागात ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

Maharashtra Times 5 Mar 2018, 4:00 am
३ लाख बालकांना लसीकरणाचे नियोजन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pulse polio campaign start at 11 march in jalgaon district
पोलिओ मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत येत्या दि. ११ मार्च रोजी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. विशेषत: ग्रामीण व अतिजोखमीच्या भागात ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची आढावा बैठक जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या वेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. या मोहिमेतंर्गत आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ३ लाख बालकांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर यांनी बैठकीत दिली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, महापालिका आरोग्य विभागाच्या श्रीमती डॉ. उगले यांचेसह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रशासनाची सज्जता

जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थान, रेल्वेस्थानक, खासगी वाहतूक स्थानकांवर लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर बाजाराच्या ठिकाणी, नर्सिंग होममध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच मजूर वस्तीच्या ठिकाणी विविध पथकामार्फत लसीकरण करण्यात येणार असून, आवश्यक असल्यास रात्रीच्यावेळीही लसीकरणाची सोय करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर यांनी बैठकीत सांगितले.

पोलिओ मोहिमेचे उद्दिष्ट...

जिल्ह्यातील (शून्य ते पाच वर्ष) ................२,९८,१५४ बालकांना लस देणार
जिल्ह्यात लसीकरण केंद्र..........................२,०५९
कर्मचारी...............................................५५६७
पर्यवेक्षक............................................४०६
मोबाइल टीम ..................................३००

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज