अ‍ॅपशहर

नाट्यगृहाचे नवीन वर्षात लोकार्पण

शहरात अद्ययावत नाटयगृहाचे लोकार्पण १ जानेवारी २०१८ ला होईल अशी घोषणा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी केली.

Maharashtra Times 17 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम puroshottam drama competition start at jalgaon
नाट्यगृहाचे नवीन वर्षात लोकार्पण


शहरात अद्ययावत नाटयगृहाचे लोकार्पण १ जानेवारी २०१८ ला होईल अशी घोषणा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी केली. ही स्पर्धा प्रतिष्ठेची असून, यात युवकांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले. महाराष्ट्र कलोपासक (पुणे) आणि केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाटयशास्त्र विभागातर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा शनिवारी (दि. १६) सुरू झाली.

शहरातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी घंटानाद करून उद्घाटन केले. मंचावर अध्यक्षस्थानी केसीई संस्थेचे सहसचिव किरण बेंडाळे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, कलोपासकचे राजेंद्र नागरे, परीक्षक श्रीपाद देशपांडे, अजय धवने, गिरीष केमकर, संस्थेचे सभासद शशिकांत वडोदकर, चारूदत्त गोखले उपस्थित होते.

प्रस्तावनेत प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धपणे कला सादर करावी, असे आवाहन केले. राजेंद्र नांगरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आयोजकांमध्ये केवळ केसीई संस्थेनेच स्पर्धेसाठी आर्थिक मदत केली असे नमूद करीत कलोपासकच्या हाकेला केसीईने मान दिल्याबद्दल आभार मानले. जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांमधील कलावंताला साद घालण्याचे काम पुरुषोत्तम करंडक स्पर्धा करते, असे सांगत महाविद्यालयीन जीवनात नाट्य स्पर्धांमध्ये भाग व प्रोत्साहन देण्याचे काम केल्याची आठवण त्यांनी करून दिली.

सूत्रसंचालन व आभार प्रा.योगेश महाले यांनी मानले. स्पर्धा आयोजनासाठी शशिकांत वडोदकर, हेमंत पाटील, प्रा. जुगलकिशोर दुबे, प्रा.विश्वजित चौधरी, प्रा.कपील शिंगाणे, प्रा. प्रसाद देसाई, प्रा. स्वप्ना लिंबेकर, प्रा. योगेश महाले, डी. डी. झोपे, प्रा. विजय लोहार, प्रा. अविनाश काटे, राकेश वाणी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या परिक्षण घेत आहे. सोसायटीने शनिवारी ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधत स्पर्धेचे आयोजन केल्याची माहितीही आयोजकांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज