अ‍ॅपशहर

रेडिओ कार्यक्रम निर्मितीवर कार्यशाळा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दि. ३० व ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ‘रेडिओ कार्यक्रम निर्मिती, वृत्तसंपादन आणि कौशल्य’ या विषयावर विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra Times 30 Aug 2018, 5:00 am
विद्यापीठात आजपासून आयोजन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम radio program production workshop in bahinabai chaudhari north maharashtra university jalgaon today
रेडिओ कार्यक्रम निर्मितीवर कार्यशाळा


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दि. ३० व ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ‘रेडिओ कार्यक्रम निर्मिती, वृत्तसंपादन आणि कौशल्य’ या विषयावर विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात दि. ३० ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी दहा वाजता या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. नितीन बारी यांच्याहस्ते होणार असून, दुसऱ्या दुपारी चार वाजता कार्यशाळेचा समारोप व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यशाळेत दि. ३० ऑगस्ट २०१८ रोजी उद्घाटनानंतरच्या प्रथम सत्रात सकाळी अकरा वाजता आकाशवाणीचे जिल्हा वार्ताहर राजेश यावलकर हे ‘रेडिओसाठी क्षेत्रीय बातमी संकलन, लेखन, निवेदन आणि जिल्हा वार्तापत्र लेखन व सादरीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात दुपारी २.३० वाजता आकाशवाणी जळगाव केंद्राचे वरिष्ठ उद्घोषक श्रीकांत दाणी हे ‘रेडिओ कार्यक्रम निर्मिती लेखन आणि उद्घोषणा कौशल्य’ या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी दि. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी तृतीय सत्रात सकाळी साडेदहा वाजता भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या मुंबई विभागाचे जनसंपर्क अधिकारी व आकाशवाणीचे माजी वृत्तनिवेदक नरेंद्रकुमार विसपुते हे ‘रेडिओ बातमी निर्मिती प्रक्रिया व निवेदन कौशल्य’ या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. चौथ्या सत्रात दुपारी २.३० वाजता आर. जे. अभय हे ‘एफ. एम. रेडिओ केंद्राची रचना, व्यवस्थापन आणि कार्यक्रम निर्मिती व कौशल्य’ या विषयावर तर आर. जे. तेजस्विनी या ‘रेडिओ जॉकी-कार्यपद्धती व कौशल्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा ही नि:शुल्क असून सर्वांसाठी खुली आहे. कार्यशाळेत इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यशाळेचे आयोजक डॉ. सुधीर भटकर, विभागप्रमुख डॉ. तुकाराम दौड, डॉ. विनोद निताळे यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज