अ‍ॅपशहर

टीसींच्या समस्या रेल्वेमंत्र्यांकडे मांडणार

रेल्वे हे संपूर्ण देशाला जोडणारे एक माध्यम असून, रेल्वेला उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे टीसी (तिकीट चेकिंग स्टाफ) आहे. परंतु, सध्या विविध समस्यांचा सामना टीसींना करावा लागत आहे. त्यांच्या या समस्या रेल्वेमंत्र्यांकडे मांडण्याचे आश्वासन खासदार रक्षा खडसे यांनी दिले.

Maharashtra Times 18 Jul 2016, 12:35 am
रक्षा खडसे यांचे आश्वासन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway staff
टीसींच्या समस्या रेल्वेमंत्र्यांकडे मांडणार

म. टा. वृत्तसेवा, भुसाव‍ळ

रेल्वे हे संपूर्ण देशाला जोडणारे एक माध्यम असून, रेल्वेला उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे टीसी (तिकीट चेकिंग स्टाफ) आहे. परंतु, सध्या विविध समस्यांचा सामना टीसींना करावा लागत आहे. त्यांच्या या समस्या रेल्वेमंत्र्यांकडे मांडण्याचे आश्वासन खासदार रक्षा खडसे यांनी दिले.

इंडियन रेल्वे तिकीट स्टाफ ऑर्गनायझेशनचा मेळावा रविवारी, भुसावळमध्ये आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार रक्षा खडसे यांनी चेकिंग स्टाफसाठी असलेल्या विश्रामगृहात सुविधा मिळण्यासह टार्गेटच्या नावाखाली त्यांची होणारी पिळवणूक थांबावी म्हणून रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. इंडियन रेल्वे तिकीट स्टाफ ऑर्गनायझेशनतर्फे खासदार रक्षा खडसे यांची संरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रशासनाने टीसींच्या समस्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा इंडियन रेल्वे तिकीट स्टाफ ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश गौतम यांनी दिला. त्यांनी विविध समस्यांचा संदर्भ देत प्रशासनाने सकारात्मक राहून समस्यांची सोडवणूक करावी, असे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज