अ‍ॅपशहर

विधान परिषदेसाठी ​ शिवसेनेकडून राजेश जैन?

विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी बुधवारपासून (दि. २६) अर्ज दाखल होण्यास सुरुवात होत आहे. त्यामध्ये शिवसेनेकडून माजी मंत्री सुरेश जैन यांचे पुत्र राजेश जैन यांच्या नावाची घोषणा होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याबाबतची चाचपणीही सुरू झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे.

Maharashtra Times 26 Oct 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajesh jain legisslative assembely
विधान परिषदेसाठी ​ शिवसेनेकडून राजेश जैन?

विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी बुधवारपासून (दि. २६) अर्ज दाखल होण्यास सुरुवात होत आहे. त्यामध्ये शिवसेनेकडून माजी मंत्री सुरेश जैन यांचे पुत्र राजेश जैन यांच्या नावाची घोषणा होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याबाबतची चाचपणीही सुरू झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे.

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची उमेदवार निश्चितीसाठी बैठक होऊन त्यात नावांबाबत चर्चा झाली. मात्र नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला असला तरी प्रारंभी सुरेश जैन हे विधान परिषदेत जावेत, अशी सेना नेत्यांची इच्छा होती. तरी घरकुल प्रकरणाचा अद्याप निकाल लागलेला नाही त्यामुळे जैन यांनीच नकार दिलेला आहे. अशा स्थितीत सुरेश जैन यांचे पुत्र राजेश जैन यांच्या नावाची चाचपणीही सुरू झाल्याचे बोलले जात आहे. अन्य इच्छुकांची पार्श्वभूमी पाहता राजेश जैन हे उजवे ठरत असल्याचे मत आहे.

विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना आज जारी होत असून २ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यंदा भाजप-शिवसेना एकत्र ही निवडणूक लढवण्याची शक्यता नाही. त्यामुळे जोपर्यंत भाजपकडून उमेदवार घोषित होत नाही, तोपर्यंत अन्य पक्षांकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता कमीच आहे.

भाजपने गुरूमुख जगवाणी यांना परत उमेदवार द्यावी यासाठी काही नगरसेवकांनी एकनाथ खडसे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. दुसरीकडे जगवाणींना असलेला विरोध पाहता नवे नाव समोर येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू डॉ. रवींद्र चौधरी अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरू शकतात. आर्थिक पाठबळ असल्याने त्यांच्या नावाची चर्चा आहे. राजकीय पक्ष भाजपला विरोध करण्यासाठी रवींद्र चौधरी यांना पाठिंबा देतील, असे एका राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने बोलताना सांगितले. पूर्ण चित्र मात्र शनिवारपर्यंत स्पष्ट होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज